Agriculture news in Marathi Time to cycle for grape insurance refunds | Agrowon

द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा मारण्याची वेळ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष पीकविम्याची देय रक्कम अद्यापही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष पीकविम्याची देय रक्कम अद्यापही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र तरीही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे चकरा मारण्याची वेळ आली आहे. 

मागील हंगाम ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ करिता लागू असलेली द्राक्ष पीकविमा प्रमाणे नाशिक विभागातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविम्याचे संरक्षण घेतले होते. त्यांना अवेळी झालेल्या पावसाचे नुकसानभरपाई म्हणून पीकविमा नियमावलीप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ३० एप्रिल २०२१ पर्यंत जमा होणे अपेक्षित होते. परंतु अजूनही विमाधारक शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघाने वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र अद्यापही विमा खात्यात वर्ग झाला नसल्याची स्थिती आहे.  

महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या शिष्टमंडळाने यापूर्वी कृषिमंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र अद्याप त्यावर कुठलीही हालचाल झालेली दिसत नाही. हातात भांडवल नसताना पदरमोड करून शेतकऱ्यांनी फळपीक  विमा योजनेत सहभाग घेतला; मात्र पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवी निमसे, सचिव बाळासाहेब गडाख, माजी सचिव अरुण मोरे यांनी नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली आहे. तर पुढील काही दिवसांत रक्कम खात्यावर वर्ग होईल, असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्‍वस्त केले.

विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केल्यानंतर सरकारने आम्हाला प्रीमीयम सबसिडीची रक्कम अद्याप वर्ग न केल्यामुळे आम्ही भरपाई देऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तर राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या विमा रकमेच्या पोटी पैसे कृषी आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी कधी पडेल हे मिळाल्यावरच खरे, अशी परिस्थिती आहे.

 परतावा देण्यासाठी आग्रह का नाही? 
पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभाग आवाहन करतो. त्यानुसार शेतकरी हजारो रुपये पदरमोड करून भरतो. नुकसान झाल्यानंतर काहीतरी पदरी पडेल ही अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात नुकसान झाल्यानंतर त्याचा परतावा वेळेवर तर कधी मिळतच नसल्याने अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे फक्त पैसे भरून घेण्यासाठी आवाहन करतात तसे परतावा देण्यासाठी कृषी विभागाचा आग्रह का नाही, असा सवाल पीकविम्याच्या परताव्याच्या प्रतीक्षेत असलेले द्राक्ष उत्पादक करीत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून...औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या...
‘नाफेड’साठी खरेदी केलेला कांदा चाळीतच...नाशिक : केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच,...
देशात नवा खत कायदा आणण्याच्या हालचालीपुणे ः देशासाठी स्वतंत्र खत कायदा तयार करण्याच्या...
शेवग्याला दराची झळाळीकोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या...
बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा...माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय...
बायोसिरप तंत्रामुळे इथेनॉल उद्योगाचे...पुणे ः उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करता येते;...
उसातील सोयाबीनचे एकरी १८ क्विंटल उत्पादनपुणे जिल्ह्यात कोऱ्हाळे बु. थोपटेवाडी (ता....
कांदा बीजोत्पादनात प्रावीण्य मिळवलेले...अंतापूर (ता.सटाणा. जि. नाशिक) येथील नानाजी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...