अमरापूर : बाजार बंदीमुळे भाजीपाला गुरांना टाकण्याची वेळ

अमरापूर, जि. नगर : ‘कोरोना’ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गावोगावी भरणारे आठवडे बाजार बंद केल्यानंतर भाजीपाला जनावरांना खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अमाप खर्च करून हाती आलेला भाजीपाला विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
Time to drop the vegetable cattle due to market restrictions

समाधानकारक पावसामुळे शेवगाव तालुक्यातील ढोरा, नंदीनी, सकुळा नद्यांवरील बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे विहिरी आणि कूपनलिकेला मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकासोबत टोमॅटो, वांगी, बटाटे, गवार, भोपळा या फळभाज्या तर मेथी, पालक, कोथिंबीर या पालेभाज्यांची लागवड केली.

ढगाळ हवामान व रोगराईमुळे मशागतीसोबतच कीटकनाशकांवर मोठा खर्च झाला. आता भाज्या निघू लागल्यानंतर काही दिवसांतच ‘कोरोना’ या संसर्गजन्य रोगाचा फैलाव व प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने गावोगावी भरणारे आठवडे बाजार बंद केले. त्यामुळे परिसरातील ढोरजळगाव, आव्हाणे, वडुले खुर्द, भातकुडगाव येथील बाजार स्थानिक ग्रामपंचायतींनी बंद केले. तर शेवगाव येथील तालुक्यातील सर्वात मोठा बाजारही बंद झाला.

तोडणीस आलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तो जनावरांना टाकण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही.गावोगावी रस्त्यावर बसून पडेल त्या किमतीला विकूनही खर्चाची तोंडमिळवणी होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर सावरू लागलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा हे कोरोनारुपी संकट ओढावले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com