मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मुदत

मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मुदत
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मुदत

अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी या वेळी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत दिली जाणार अाहे. मतदानासाठी पहिल्यांदाच नेहमीपेक्षा एक तासाने ही वेळ अधिक ठेवण्यात अाली अाहे. निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी सोमवारी (ता. १८) सायंकाळी अायोजित पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबत सांगितले.  ते म्हणाले,भारत निवडणूक आयोगाने १० मार्चला आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तत्‍काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्‍यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाने निवडणूक पूर्व तयारी केलेली अाहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर तयारी केली जात अाहे. पत्रकार परिषदेला पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाळ, नायब तहसीलदार निवडणूक सतीश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंगळवार (ता. १९) पासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरवात होत अाहे. मंगळवार (ता. २६) पर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार अाहे. शुक्रवारी (ता. २९) मागे घेता येईल. त्यानंतर १९ एप्रिलला या मतदारसंघात मतदान होणार अाहे. अकोला महानगरातील अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोचविण्यासाठी अाॅटोरिक्षा संघटनेने विनामूल्य सेवा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. पापळकर यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेसाठी नऊ हजार १०४ अधिकारी, कर्मचारी नेमण्यात अाले अाहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व), मूर्तिजापूर अाणि रिसोड हे सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात. या लोकसभा निवडणुकीसाठी सध्यापर्यंत १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार असून यात ९ लाख ६२ हजार ५७६ पुरुष अाणि ८ लाख ९२ हजार १५९ महिला मतदार अाहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात अाली अाहे. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तरपणे माहिती देत मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचेही अावाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com