शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी. साईनाथ
शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी. साईनाथ

शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी. साईनाथ

औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरविना दुसरा पर्याय नाही. दुष्काळाचे मूल्यमापन करण्याचे नियम क्‍लिष्ट झाले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी मंगळवारी (ता. १५) व्यक्‍त केले. 

बेट्रा संस्थेच्या सभागृहात पी. साईनाथ यांनी ‘नेशन फॉर फार्मर्स’ चळवळीचा प्रसार औरंगाबादेत व्हावा या उद्देशाने शहरातील काही डॉक्‍टर, प्राध्यापक, वकील, चळवळीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. एमजीएमचे प्रतापराव बोराडे, एआयबीईएचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर, प्रा. अजीत दळवी, प्रा. विजय दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

पी. साईनाथ म्हणाले, की मराठवाड्यातील शेतकरी सध्या संक्रमणातून जात आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी हा विभाग सध्या होरपळतो आहे. ४० टक्के ग्रामीण भाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. शेतकरी आणि शेतकऱ्यांबाबत तातडीने निर्णय होत नसल्यामुळे सावकारांचे फावत चालले आहे. २०१४ मध्ये कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाने शासनाकडे अहवाल दिला. त्यावर आजवर निर्णय झाला नाही. १९९८ पूर्वी भारतातील शेतकऱ्यांची काहीही मागणी नव्हती; परंतु नंतरच्या काळात शेती आधारित अभियांत्रिकीमुळे शेती आणि शेतकऱ्यांची व्याख्या बदलली. शेतकरी आत्महत्येचे सरकारी आकडे खोटे आहेत. कारण एनसीआरबी ही संस्थाच सरकारने अवसायनात काढली. शासनाने अनेक विभाग विलीनीकरण, केंद्रीकरण आणि पुन्हा विलीनीकरण केल्यामुळे कुणाचाही कुणाला मेळ राहिलेला नाही. शेतकरी आत्महत्यांबाबत असलेला डेटा चुकीचा असल्याचा आरोप पी. साईनाथ यांनी केला. 

मराठवाड्यात बोअरवेल्स आणि टॅंकर पाणीपुरवठा हा कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग बनला आहे. प्रत्येक गावात दिवसाकाठी तीन बोअरवेल्स खोदल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com