agriculture news in Marathi time for seed production area Maharashtra | Agrowon

बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या हरभरा बीजोत्पादनाच्या क्षेत्र नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

पुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या हरभरा बीजोत्पादनाच्या क्षेत्र नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या संचालकांनी नगर, परभणी, जालना, जळगाव, अकोला आणि नागपूरच्या विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यात मुदतवाढीबाबत कळविले आहे. त्यामुळे क्षेत्र नोंदणीची अंतिम तारिख आता २० नोव्हेंबरऐवजी ३० नोव्हेंबर अशी गृहीत धरली जाईल.

‘‘ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिपावसामुळे ज्वारी, करडई, हरभरा या रब्बी पिकांच्या पेरणीला पोषक वातावरण मिळणार नाही. तसेच पेरणीयोग्य जमिनीच्या मशागतीची कामेदेखील रखडल्याने पेरणीला उशीर होईल, असे अहवाल विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांनी पाठवले होते,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

रब्बी हंगामात येणाऱ्या ज्वारी, हरभरा, करडई या सर्व पिकांच्या बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीच्या तारखेत वाढ करण्याचे प्रस्तावदेखील सादर करण्यात आले होते. त्यानुसार बीज प्रमाणीकरण संचालकांनी ज्वारी व करडईला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. आता हरभऱ्याच्या मुदतवाढीला देखील मान्यता दिली आहे. 

‘‘नोंदणीअभावी बीजोत्पादनापासून वंचित असलेले शेतकरी केवळ ५० रुपये शुल्क भरून नोंदणी करू शकतात,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. तर सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा स्वतःकडील घरगुती बियाणे वापरात मोठी वाढ करतील, असा दावा कृषी खात्याकडून केला जात आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
कृषी कायद्यांना एकसंध विरोध; मुंबईत...मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा,...
रिक्त पदे तत्काळ भरारिक्त पदांमुळे कृषी विभागाच्या कामांचा बोजवारा...
आरोग्यमय जीवनासाठी फळे-भाज्यांचे सेवन...संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४...
मागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्णपुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी...
शेतकरी पुत्राने बनवले वाहन ऊस भरणी यंत्रसातारा : सध्या ऊस हंगामातील सर्वात मोठी समस्या...
मध्य महाराष्ट्रात थंडी; निफाडला नीचांकी...पुणे : राज्यातील किमान तापमानात चढउतार होत आहे....
गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारेऔरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल-कोपरवेल व आडगाव (...
तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं...लासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील निवृत्त सैनिक...
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...
लाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...
शेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरणपुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून...
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यतापुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
पशुसंवर्धन विभागात ३० टक्‍के पदे रिक्‍तनागपूर : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुर्दशेसोबतच...
दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील...नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले...
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...