Agriculture news in Marathi, Time to show the value of your vote | Agrowon

आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ : अनिल घनवट

सुर्यकांत नेटके
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा संबंध निर्माण झाला तो १९८० च्या दशकात. त्यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये शेती हा विषय कोणत्याच पक्षाच्या जाहीरनाम्यावर दिसत नव्हता. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाचा उदय झाला व ‘शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण’ असे ते ठासून सांगू लागले. पंचवार्षिक योजनेत, शेतीमालाला किफायतशीर भाव देणे देशाला परवडणार नाही, असे लेखी धोरण छापल्याचे पुरावे ते सादर करू लागले. शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे हा शेतकऱ्यांच्या मुखातला पर्वणीचा शब्द झाला होता. 

शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा संबंध निर्माण झाला तो १९८० च्या दशकात. त्यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये शेती हा विषय कोणत्याच पक्षाच्या जाहीरनाम्यावर दिसत नव्हता. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाचा उदय झाला व ‘शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण’ असे ते ठासून सांगू लागले. पंचवार्षिक योजनेत, शेतीमालाला किफायतशीर भाव देणे देशाला परवडणार नाही, असे लेखी धोरण छापल्याचे पुरावे ते सादर करू लागले. शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे हा शेतकऱ्यांच्या मुखातला पर्वणीचा शब्द झाला होता. 

लाखोंच्या सभा आणि ‘न भूतो, न भविष्यती’ अशी आंदोलने महाराष्ट्राने पाहिली. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये ‘शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ’ हे कलम सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातील एक नंबरचे कलम होते. इथे पहिल्यांदा शेतक्यांच्या प्रश्नाचा व निवडणुकांचा संबंध आला. पुढे महाराष्ट्रात पुलोद आघाडी झाली. त्या शेतकरी संघटनेचा सहभाग होता, अनेक उमेदवार उभे केले पुलोदची सत्ता आली. नाशिकचे चौदाचे चौदा उमेदवार शेतकरी संघटनेचे आमदार म्हणून निवडून येण्याचा चमत्कार महाराष्ट्राने पाहिला आहे.

१९९० च्या दशकात कर्जमुक्तीचा विषय शेतकरी संघटनेने उचलला व पुन्हा सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यावर कर्जमुक्तीला एक नंबरचे स्थान मिळाले. पुढे चालून हा विषय देश पातळीवर गेला. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले व्ही. पी. सिंग यांना शरद जोशींनी कर्जमुक्तीचा मुद्दा समजावून सांगितला. त्यांना महाराष्ट्रभर फिरवले. दहा-दहा लाखाच्या सभा केल्या. तेव्हा व्ही. पी. सिंगांनी संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. पण दहा हजार रुपयांची कर्जमाफी शेतकरी संघटनेच्या दबावामुळे कशीबशी शेतकऱ्यांच्या पदरात पडली होती. संघटनेच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना फायदा होत गेला, मात्र शेतकऱ्यांना शेतीच्या प्रश्नावर मतदान करण्याचे धैर्य किंवा बुद्धी शेतकरी संघटना देऊ शकली नाही. ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी नेहमीच शेतकऱ्यांचा बळी देण्यात आला, पण शेतकरी आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी किंवा भिती पोटी उघडपणे विरोध किंवा विरोधात मतदान करण्याचे धाडस करू शकला नाही. स्वतः शरद जोशींना पराभव पचवावे लागले. 

स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक निवडणुका झाल्या. निवडणुकीचा मुद्दा कधी गरिबी हटाव, स्थिर सरकार, मंडल आयोग, राममंदिर, हिंदुत्व, भ्रष्टाचार, जनलोकपाल, पुलवामा व आता  ३७० कलम या विषयांवर निवडणुका झाल्या. कृषिप्रधान भारत देशाची एकही निवडणूक शेती धोरणाच्या मुद्द्यावर झाली नाही ही शोकांतिका आहे. कांदा महाग झाला तर शहरातील संघटित वर्ग सरकारे पाडतात याची दहशत सर्व राजकीय पक्षांनी घेतलेली आहे. कांदा स्वस्त केला तर शेतकरी सुद्धा सरकारे उलथी पालथी करू शकतात ही दहशत ज्या वेळेला शेतकरी निर्माण करेल त्याच वेळेला निवडणुकीत शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा, सत्ताधारी गांभीर्याने विचार करतील. आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी मताची ताकद दाखवून देणे गरजेचे आहे. नेत्याच्या लेकरांपेक्षा आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याचा विचार करून मतदान केले तरच शेतीचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे नाहीतर आत्महत्यांच्य‍ा आकड्यांची बेरीज करीत राहण्या शिवाय शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरणार नाही.

- अनिल घनवट,
प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणित)

(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...