खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत वापरा ः जाधव

जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड ओळ पद्धतीचा अवलंब करावा. उत्पन्न दुप्पट होण्याचा ही एक नावीन्यपूर्ण पेरणी पद्धत असू शकते.’
At the time of sowing soybeans in kharif Use pair line method: Jadhav
At the time of sowing soybeans in kharif Use pair line method: Jadhav

जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड ओळ पद्धतीचा अवलंब करावा. उत्पन्न दुप्पट होण्याचा ही एक नावीन्यपूर्ण पेरणी पद्धत असू शकते’’, असा आशावाद विभागीय कृषी सहसंचालक डी. एल  जाधव यांनी व्यक्त केला. 

जिल्ह्यातील आकणी या ठिकाणी शेतकरी डिगांबर बोराडे यांच्या शेतावर कृषी विभाग व ‘आत्मा’अंतर्गत नावीन्यपूर्ण हरभरा पीक प्रत्यक्षिकाची पाहणी विभागीय कृषी सहसंचालक डी. एल  जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे इतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.२५) केली. तालुका कृषी अधिकारी (मंठा) व्ही. जे. राठोड, मंडळ कृषी अधिकारी (तळणी) आर .आर. आघाव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आर. एम. मोहाडे, सहायक व्यवस्थापक आर. टी. कोहिरे आदी उपस्थित होते.

हरभरा प्रत्यक्षिकाची पाहणी करून विविध बद्दल जाधव व शिंदे यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मंठा तालुक्यात रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या पिकामध्ये नावीन्यपूर्ण पद्धतीने पेरणीमध्ये  बदल करून ८९ हेक्टर क्षेत्रावर  प्रात्यक्षिके घेण्यात आली. या मध्ये आकणी, बेलोर, ढोसकाळ, तळणी, लिंबेवडगाव या गावांचा समावेश आहे. प्रत्यक्षिकांमध्ये एका हरभऱ्याच्या झाडाला चक्क सरासरी ३०० ते ३५० घाटे आढळून आले.

नावीन्यपूर्ण बदल 

  •   जोड ओळीवर हरभरा पेरणी 
  •   एकरी १८ किलो बियाण्याचा वापर
  •   ३० दिवसानंतर कोळप्याच्या साह्याने दंड पाडले.
  •   बेड तयार झाले.
  •   दोन झाडातील अंतर १० सेंटीमीटर.
  •   दोन ओळींतील अंतर ४५ सेंटीमीटर .  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com