Agriculture news in marathi Time to throw flowers in farm in Nanded, Parbhani, Hingoli district | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले शेतातच फेकून देण्याची वेळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

विक्री बंद असल्यामुळे गुलाबांची नासाडी होत आहे. त्यामुळे दररोज तीन ते साडेतीन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. गुढीपाडव्याला गुलाबाला सव्वाशे ते दिडशे रुपयांपर्यंत दर मिळतात. परंतु, यंदा मोठा फटका बसला आहे. 
- दिगंबर बुलबुले, नागठाणा, ता. उमरी जि. नांदेड

दोन एकर क्षेत्रावर गुलाब, गलांडा, मोगरा, काकडा, फुलझाडांची लागवड केली आहे. सेलू येथे फुल विक्रीचा 
स्टॅाल आहे. ‘लॅाकडाऊन’मुळे फुले तोडून शेतात फेकून द्यावी लागत आहेत. 
- पुसाराम ढगे, काजळी रोहिना, ता. सेलू, जि.परभणी

चार एकर क्षेत्रावर लिली, गलांडा, मोगरा आदी फुलांची शेती आहे. मार्केट बंद असल्यामुळे दररोजचे तीन ते चार हजार रुपये उत्पन्न बुडत आहे. लिलीच्या कळ्या शेतातच उमल्यामुळे फुले फेकून द्यावी लागणार आहेत. 
- गुलाब कदम, तपोवन, ता.वसमत, जि.हिंगोली. 

नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या फुलांच्या मार्केटमधील खरेदी- विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याला फुले आणि हारांच्या विक्रीतून मोठी उलाढाल होते. परंतु, यंदा मार्केट बंद राहिल्याने फुले तोडून शेतातच फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. 

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांतर्गंत लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, सभा, परिषदा आदी कार्यक्रम बंद करण्यात आले. त्याचा परिणाम नांदेडसह अन्य ठिकाणच्या फुलांच्या मार्केटमधील खरेदी- विक्रीच्या व्यवहारावर झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून लॅाकडाऊन आहे. त्यामुळे फुलांचे मार्केट बंद आहे. एस.टी, रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे नांदेड, अर्धापूर, मुदखेड, उमरी आदी तालुक्यांतील गुलाब तसेच अन्य फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

गुढीपाडव्याला गुलाब, गलांडा, मोगरा, काकडा आदी फुलांसह त्यांच्या हारांना मोठी मागणी असते. चांगले दरही मिळतात. परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत आदी, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढानागनाथ, कळमनुरी, हिंगोली, सेनगाव आदी तालुक्यातील अनेक शेतकरी गुलाब, गलांडा, मोगरा, लिली, निशिगंध आदी फुलांचे उत्पादन घेतात. ‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना फुले फेकून द्यावी लागत आहेत. त्यांचे दररोजचे हजारो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...