Agriculture news in marathi Time to throw lemons at farmers in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं फेकण्याची वेळ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी भडगाव,  पाचोरा हा परिसर प्रसिद्ध आहे. लिंबाला दर नसल्याने उत्पादकांना फटका बसत असून, लिंबू शेतातच फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी भडगाव,  पाचोरा हा परिसर प्रसिद्ध आहे. लिंबाला दर नसल्याने उत्पादकांना फटका बसत असून, लिंबू शेतातच फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

भडगाव तालुक्यात गुढे व परिसरात रोज १०० मेट्रिक टन लिंबाची काढणी केली जाते. परंतु, यंदा लिंबाला दर नाहीत. खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. लिंबांसाठी भडगाव-पाचोरा येथील बाजार प्रसिद्ध आहे. हा बाजार व्यवस्थित सुरू नाही. तसेच इतर भागातही लिंबाची निर्यात किंवा पाठवणूक केली जाते. अनेक शेतकरी मालवाहू वाहनातून मुंबई, पुणे येथेही लिंबू पाठवायचे. परंतु, यंदा परजिल्ह्यातील बाजारही विस्कळीत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

लिंबांचे दर २० किलोला ३०० रुपये आहे. तर, पिवळ्या लिंबांना दर २० किलोला ७० ते १५० रुपये दर आहे. एवढे कमी दर मागील पाच वर्षात मिळाले नव्हते. मागील वर्षी लिंबाला २० किलोला १५०० रुपयांपर्यंतचे दर मिळत होते. यंदा दरच नसल्याने काढणीची मजुरी व इतर खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

लिंबांची काढणी व इतर मजुरीदेखील सध्या परवडत नाही. कारण, दर निच्चांकी स्थितीत आहेत. दर २० किलोला फक्त ३०० रुपये दर आहे. या दरात लिंबू विक्रीपेक्षा तो शेतातच सोडून द्यावा लागत आहे. 
- शिवाजी पाटील, शेतकरी, बांबरूड (ता. भडगाव, जि.जळगाव)


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...