नाशिक : कृषी विभागातील ३५० कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती

कृषी विभागातील ३५० कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती
कृषी विभागातील ३५० कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती

नाशिक  ः जिल्ह्यातील कृषी विभागात कार्यरत असणाऱ्या कृषी पर्यवेक्षक व सहायक यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचे पत्र नुकतेच विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर मान्य झाली असून, जिल्ह्यातील ३५० पेक्षा जास्त कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याने कृषी सहायक संघटनेने आभार मानले. कृषी सहायक संघटनेतर्फे आश्वासित प्रगती योजनेचे कालबद्ध पदोन्नती प्रस्तावाचे आदेश मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय व प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे १०, २० व ३० वर्षे कालबद्ध पदोन्नतीचे आदेश कृषी सहायक व संबंधितांना देण्यात आले आहेत. नाशिक विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांनी कमी कालावधीत अडचणी दूर करून कृषी सहायक व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांचे विविध अडचणी सोडविल्याबद्दल त्यांचे कृषी सहायक संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. या वेळी नाशिकमधील राज्य प्रतिनिधी बापूसाहेब शेंडगे, जिल्हा अध्यक्ष शरद थेटे, संघटनेचे पदाधिकारी अरविंद आढाव, राजेंद्र काळे, श्रीमती थोरात, आबा आटोळे, रणजित आंधळे, श्री. सोनार साहेब, सुरेश शेळके, संदीप पठारे व जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com