Agriculture News in Marathi TIncrease in prices of leafy vegetables in Pune | Page 2 ||| Agrowon

पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम सुरू झाल्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे.

पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम सुरू झाल्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. बाजार समितीची शनिवारी (ता.२५) साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारी (ता.२७) शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ विविध बाजार घटकांचा बंद, अशा दोन बंदमुळे बाजारात रविवारी (ता.२६) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे १०० ट्रक आवक झाली होती.

दरम्यान पितृपंधरवडा सुरू असल्याने विविध भाजीपाल्यांची आणि पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाल्याने बहुतांश भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली होती. यामध्ये प्रामुख्याने भेंडी, गवार, टोमॅटो, फ्लॉवर, शेवगा, सिमला मिरची, पावटा मटार यांच्या दरात वाढ झाली होती. 

परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ टेम्पो, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, इंदौर येथून गाजर ४ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ टेम्पो तर मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती आवक झाली होती. गवार, भेंडी, सिमला मिरची आणि फ्लॉवर प्रत्येकी सुमारे ८ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, स्थानिक मटार १५० गोणी, टोमॅटो ७ हजार क्रेट, कांद्याची ४० ट्रक आवक झाली होती. आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाट्याची ६० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : १७०-२१०, बटाटा : ८०-१३०, लसूण : ३००-९००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : २००-३००, गवार : गावरान - ६००-७००, सुरती- ५००-६००, टोमॅटो : १००-२००, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : १००-२००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २५०-३००, काकडी : १००-२५०, कारली : हिरवी १४०-१५०, पांढरी ९०-१००, पापडी : ३००-३५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : ३००-४००, कोबी : ६०-८०, वांगी : २५०-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २००-४००, तोंडली : कळी २८०-३००, जाड : १२०-१४०, शेवगा : ४००-४५०, गाजर : २००- २५० वालवर : ३००-३५०, बीट : ८०-१००, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३००-३५०, पावटा : ३५०-४००, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार - १०००-१४००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१८०-२००, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे एक लाख तर मेथीच्या ४० हजार जुड्या आवक झाली होती. 
कोथिंबीर - १०००-२१००, मेथी -१२००-१८००, शेपू ८००-११००, कांदापात ७००-१०००, चाकवत -८००-१०००, करडई ६००-८००, पुदिना २००-४००, अंबाडी - ५००-६००, मुळे - ८००-१३००, राजगिरा - ६००-८००, चुका १४००-१५००, चवळई - ५००-८००, पालक १०००-१२००. 
 
फळबाजारात रविवारी (ता.२६) लिंबाची सुमारे अडीच हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ५० टन, मोसंबी ३५ टन, संत्रा २५ टन, पपई ८ टेम्पो, चिकू २ हजार गोणी, पेरूची सुमारे १ हजार क्रेट, सीताफळ १० टन, कलिंगड ३ तर खरबूज २ टेम्पो आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : ३००-६००, मोसंबी : (३ डझन) : १५०-२२०, (४ डझन) : ८० -१५०, संत्रा : (१०किलो) : १५०-२५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१३०, गणेश : ५-२५, आरक्ता १५-६०. कलिंगड : ५-१० खरबूज : १५-२५ पपई : ८-१०, चिकू (१० किलो) १००-५५०, पेरू (२० किलो): २००-३५०. 

फुलबाजार 

गणेशोत्सवानंतर विविध फुलांची मागणी घटली असून, पितृपंधरवड्यामुळे देखील मागणी नसल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत घट झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी नसल्यामुळे फुलांचे भाव निम्म्याने उतरले आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर (ता. ७) जिल्ह्यासह राज्यातील मंदिरे खुली होणार आहे. या काळात फुलांची आवक व मागणी वाढून दरही वाढतील, अशी शक्यता व्यापारी सागर भोसले यांनी वर्तविली आहे. 

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-२०, गुलछडी : १०-३०, अॅष्टर : (पाच जुड्या) २-५, सुट्टा १०-२००, कापरी : १०-२०, शेवंती : १००- ४०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१५, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ३०-६०, जरबेरा : १०-२५, कार्नेशियन : ४०- ६०, शेवंती काडी ८०-१५०, लिलियम (१० काड्या) ७००-८००, ऑर्चिड २००-३००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ४०-६०, जुई २००-२५०. 
 
मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता.२६) खोल समुद्रातील मासळीची सुमारे २५ टन , खाडीच्या मासळीची सुमारे ४०० किलो, नदीच्या मासळीची दीड टन तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची सुमारे १५ टन आवक झाली होती. गणेशोत्सवानंतर मासळीला मागणी वाढली असून नवरात्रोत्सवापर्यंत मासळीला चांगली मागणी राहील, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

मटण आणि चिकनला मागणी असल्याचे, असे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे तसेच चिकन विक्रेते रूपेश परदेशी यांनी सांगितले. तसेच इंग्लिश अंड्यांना चांगली मागणी आहे. गावरान अंड्यांच्या दरात शेकड्यामागे ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली. इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे २० रुपयांनी वाढ झाली. 

खोल समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) : पापलेट : कापरी : १२००-१४०० मोठे -१२००-१४०० मध्यम : ७००-८००, लहान ५५०-६५०, भिला : ४८०-५५०, हलवा : ४५०-५५०, सुरमई : ३००-८५०, रावस : लहान ५५०-६५०, मोठा : ८५० घोळ : ८५०, करली : २००-३२०, पाला : ११००-१५००, वाम : पिवळी : २८०-४८०, करंदी (सोललेली)-४४०-४८० ओले बोंबील : १००-१८०, कोळंबी : लहान १६०-२८०, मोठी-३६०-४८०, जंबो प्रॉन्स : १००० किंग प्रॉन्स : ८५० लॉबस्टर : १३००, मोरी : २८०-३६०, खेकडे : २८०-३२० चिंबोऱ्या : ४००-५५०, मांदेली-१२०-१३०, राणीमासा-१४०-१८० 

खाडीची मासळी : सौंदाळे-२८०, खापी- -- नगली : ३००-४००, तांबोशी : ४००-४८०, पालू- २४०, बांगडा : लहान-१६०-२००, बांगडा मोठा- २४०-३२०, शेवटे २४०-२८०. तिसºया: २४०- २८०, खुबे : १२०, लेपा-१२०-१६०, शेवटे-२००-२४०, पेडवी-८०-१००, वेळुंजी-१६०, खुबे-१२०, तारली-१६० 

नदीची मासळी 
रहू-१४०-१६०, कतला-१४०-१६०, मरळ-३६०-४००, शिवडा-२००, खवली-२००-२२०, आम्ळी-८०-१००, खेकडे-२००-२४०, वाम-४००-४८० 

मटण- बोकडाचे ६६० , बोलाईचे- ६६० , खिमा-६६० , कलेजी-७०० 

चिकन २२० , लेगपीस-२८० , जिवंत कोंबडी-१५० , बोनलेस-३२० 

अंडी 
गावरान शेकडा ९१०, डझन १२०, प्रतिनग १० 
इंग्लिश शेकडा ४७२ डझन ६६, प्रतिनग ५.५० 

 


इतर बाजारभाव बातम्या
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये डाळिंबाचा दर मागणीमुळे टिकूननाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांची मागणी, दर स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कांदा २०० ते ४५०० रुपये क्विंटलजळगावात क्विंटलला १४०० ते २४०० रुपये ...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक, दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीचे दर पुन्हा...सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये वांगी, घोसाळ्यासह मेथी,...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कोथिंबिरीच्या दरात तेजी कायमनाशिकात क्विंटलला ७००० ते १८१०० रुपये नाशिक :...
नगरला दोडका, भेंडीच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
औरंगाबादमध्ये कोबी, वांगी, आले दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...