Agriculture news in marathi tips for boosting the immune system Naturally | Agrowon

नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

शारदा पाटेकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत तयार होणारी क्षमता होय. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्‍यक आहे.

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत तयार होणारी क्षमता होय. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्‍यक आहे.

बदलते हवामान आणि प्रदूषित हवेमुळे अनेक प्रकारचे हानिकारक विषाणू आणि जिवाणू श्‍वसनासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात. आपली रोगप्रतिकार शक्ती कमजोर झाल्यावर यांच्यामुळे सर्दी, खोकला आणि अॅलर्जी सारख्या समस्या उद्भवतात. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत तयार होणारी क्षमता होय. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्‍यक आहे. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन आपण आजारांना बळी पडतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय 
जीवनसत्त्व क युक्त फळे
विविध संक्रमित रोगांपासून बचाव करण्यासाठी जीवनसत्त्व क चे सेवन करणे फायदेशीर ठरते. लिंबू, आवळा, संत्री या फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व क आढळते. जीवनसत्त्व क मुळे वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती शरीरास मिळते, सोबतच हाडेही मजबूत होतात. हृदयासंबंधी आजारांवरही जीवनसत्त्व क फायदेशीर आहे.

आवळा

  • आरोग्यवर्धक फळ म्हणून आवळ्यास ओळखले जाते. आवळा खाण्यामुळे शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. नियमित स्वरूपात आवळा रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
  • आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व क असते. निरोगी आरोग्यासाठी आवळा चूर्णाचे मधासह सेवन करावे.

संत्री आणि मोसंबी

  • संत्री आणि मोसंबी ही अत्यंत गुणकारी फळे आहेत. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. मोसंबीमध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असल्याने शरिरातील अशक्तपणा दूर होतो.
  • शारीरिक काम करणाऱ्यासाठी मोसंबीच्या ज्यूसचे सेवन फायदेशीर ठरते. या फळांना अँटिऑक्सिडंट्स चा एक उत्तम स्रोत मानले जाते. याच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रित ठेवली जाते.

लिंबू 
लिंबू एक बहुगुणी आणि औषधी फळ आहे. लिंबाचा रस, साल हे सुद्धा उत्तम आरोग्यासाठी आणि विविध सौंदर्य उपचारांवर गुणकारी आहे. लिंबामधील ॲंटीबॅक्टेरिअल आणि ॲंटीऑक्सिडंट गुणधर्म रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. लिंबाच्या नैसर्गिक ॲंटीसेप्टीक गुणधर्मामुळे ते त्वचा संबंधित समस्यांवर फार गुणकारी ठरते.

औषधी काढा किंवा चहा 
तुळस, आले, दालचिनी किंवा मिरे आणि हळद यांपासून बनविलेला काढ्यामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात. आले आणि गवती चहापासून बनविलेला चहा आरोग्यदायी असतो. सर्दी, खोकला आणि अन्य आजारांवर एक घरगुती आणि गुणकारी उपाय म्हणून काढा आणि चहाचा वापर होतो. तुळस आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टरीयल आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. तसेच घशातील खवखवीवर उपयुक्त.

जीवनसत्त्व ड 

  • सूर्यप्रकाश हा जीवनसत्त्व ड चा मुख्य स्रोत मानला जातो. सकाळच्या कोवळ्या उन्हातून शरीराला जीवनसत्त्व ड मिळते. कोवळे ऊन अंगावर घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
  • ‘जीवनसत्त्व ड’युक्त पदार्थांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास मदत होते. जीवनसत्त्व ड मिळविण्यासाठी आहारात मासे आणि दुधाचा समावेश करावा.

लसूण 
कच्चा लसूण औषधी मानला जातो. लसणामध्ये जीवनसत्त्व अ, सल्फर आणि झिंक मुबलक प्रमाणात असतात. तसेच लसणामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असते. लसणातील अँटिऑक्सिडंट आतड्यातील जंतू संसर्गावर गुणकारी असते. दररोज दोन लसूण कुड्या खाल्याने फायदेशीर ठरते. आहारात लसणाचा नियमित वापर केल्यास कर्करोगाचा धोका कमी होते. कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस लसूण प्रतिकार करतो.

हिरव्या पालेभाज्या

  • हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पालक मध्ये फोलिक आम्ल असते. जे शरीरात नवीन पेशी बनवण्यासाठी आणि जुन्या पेशी चांगल्या करण्यासाठी उपयोगी असते. पालकामधील विविध घटक शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
  • ब्रोकोलीपासून शरीराला जीवनसत्त्व अ आणि क, प्रथिने आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मशरूम खाणे देखील फायदेशीर ठरते.

संपर्क- शारदा पाटेकर, ९१५६०२७७३८
(के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...