Agriculture news in marathi Tired of the District Bank Recover billions of rupees in debt | Agrowon

जिल्हा बँकेचे थकलेले  कोट्यवधींचे कर्ज वसूल करा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

 कर्जमाफीचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. यासाठी जिल्हा सहकारी बँकेचे थकीत असलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज मोठ्या थकबाकीदारांकडून तत्काळ वसूल करण्याची आवश्यकता असल्याची मागणी आमदार श्‍वेता महाले यांनी केली.

चिखली, जि. बुलडाणा : शासनाने केलेल्या कर्जमाफीचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. यासाठी जिल्हा सहकारी बँकेचे थकीत असलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज मोठ्या थकबाकीदारांकडून तत्काळ वसूल करण्याची आवश्यकता असल्याची मागणी आमदार श्‍वेता महाले यांनी केली. सोमवारी (ता. तीन) आयोजित जिल्हा खरीप आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह इतर उपस्थित होते. 

या वेळी महाले म्हणाल्या, ‘‘जिल्हा बँकेच्या थकबाकीदारांकडे ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी चिखली मतदारसंघात आहे. सदर थकबाकीमुळे जिल्हा बँक अडचणीत आली व विविध कार्यकारी संस्था बंद पडल्या.

विविध कार्यकारी संस्था बंद पडल्यामुळे कर्ज वाटपाची सगळी जबाबदारी राष्ट्रीयकृत बँकांवर येऊन पडली. एक शाखा दररोज केवळ ५० शेतकऱ्यांना कर्ज वाटू शकते. पूर्वी प्रत्येक गावात विविध कार्यकारी सोसायट्या होत्या. सोसायट्यांमार्फत सहा ते सात दिवसांत संपूर्ण गावकऱ्यांना कर्जाचे वाटप होत असे, परंतु काही थकबाकीदारांकडून वसुली होत नसल्याने जिल्हा बँक अडचणीत आलेली आहे.

थकीत कर्ज न भरल्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कर्ज मिळाल्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर तत्काळ श्रीमंत थकबाकीदारांकडून कर्जाची वसुली करा, अशी मागणी केली. आमदार महाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दखल घेत बड्या थकबाकीदारांकडून तत्काळ कर्ज वसूल करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  थकबाकीदारांमुळे लाखो शेतकरी अडचणीत येत असतील तर ही बाब योग्य नाही, असेही ते पुढे म्हणाले. 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...