तिरु नदीवर होणार बॅरेजेसची साखळी

लातूर ः जिल्ह्यातील जळकोट सारख्या दुष्काळी भागाच्या विकासाच्या तसेच सिंचनासाठी दृष्टीने महत्त्वाच्या तिरु नदीपात्रात आता बॅरेजेसची शृंखला होणार आहे.
 Tiru will be on the river Chain of barrages
Tiru will be on the river Chain of barrages

लातूर ः जिल्ह्यातील जळकोट सारख्या दुष्काळी भागाच्या विकासाच्या तसेच सिंचनासाठी दृष्टीने महत्त्वाच्या तिरु नदीपात्रात आता बॅरेजेसची शृंखला होणार आहे. नदीपात्रातील सात कोल्हापुरी बंधाऱ्यांचे रूपांतर व विस्तार केला जाणार आहे. यासाठी शासनाने सुमारे शंभर कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. बॅरेजेस तयार झाल्यानंतर या तालुक्यात तिरु नदीच्या ४० किलोमीटर पात्रात बारमाही पाणी राहील. शाश्वत पाणीसाठा राहिल्याने सिंचनाची सोय होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या तिरु नदीवर १९९०-९१ च्या दरम्यान डोंगरगाव एक व दोन, बेलसांगवी, बोरगाव, सुल्लाळी, तिरुका व गव्हाण असे सात कोल्हापुरी बंधारे आहेत. एकतीस वर्षापूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्यांची अवस्था दयनीय झाली होती. शासनाकडून दुरुस्तीसाठी पैसाही दिला जात नाही. त्यामुळे हे बंधारे मोडकळीस आले होते. दुरुस्तीची शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी होऊनही याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. पण, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला. यातून बंधाऱ्यांच्या बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यासाठी सुमारे १०० कोटीच्या निधीला मंगळवारी (ता.८) प्रशासकीय मान्यता मिळाली. 

जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात येथे पहिल्यांदा बॅरेजेसची संकल्पना राबवली. यातून मांजरा व तेरणा नदीवर बॅरेजेस उभे राहिले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकीत बनसोडे यांनी पुढाकार घेतला. इतका मोठा निधी मांजरा व तेरणा नदीवरील बॅरेजेसनंतर पहिल्यांदाच मिळाला आहे. 

...असे होणार बॅरेजेसमध्ये रूपांतर

डोंगरगाव क्रमांक एक कोल्हापुरी बंधारा   बांधकाम - १९९०-९१   एकूण लांबी- ७०.५० मीटर   साठवण क्षमता - ०.३५८ दलघमी   सिंचन क्षमता - ८७ हेक्टर   निधी मंजूर - १३ कोटी ९६ लाख २३ हजार ९६८ रुपये

डोंगरगाव क्रमांक दोन कोल्हापुरी बंधारा   बांधकाम-१९९१-९२   एकूण लांबी - ७०.५० मीटर   साठवण क्षमता - ०.२४८ दलघमी   सिंचन क्षमता - ६१ हेक्टर   निधी मंजूर - १९ कोटी आठ लाख ८३ हजार पंधरा रुपये

बेलसांगवी कोल्हापुरी बंधारा   बांधकाम - १९९१-९२   एकूण लांबी - ५२.५० मीटर   साठवण क्षमता-०.२०८ दलघमी   सिंचन क्षमता-५३ हेक्टर

निधी मंजूर-११ कोटी २५ लाख दोन हजार १५० रुपये

बोरगाव कोल्हापुरी बंधारा   बांधकाम-१९९१-९२   एकूण लांबी-४६.५० मीटर   साठवण क्षमता-०.२०१ दलघमी   सिंचन क्षमता-५२ हेक्टर   निधी मंजूर-१२ कोटी ८१ लाख ३८ हजार २९२ रुपये

तिरुका कोल्हापुरी बंधारा   बांधकाम-१९९१-९२   एकूण लांबी-५८.५० मीटर   साठवण क्षमता-०.३८० दलघमी   सिंचन क्षमता-९८ हेक्टर   निधी मंजूर-१८ कोटी ७० लाख ९० हजार २५५

सुल्लाळी कोल्हापुरी बंधारा   बांधकाम-१९९१-९२   एकूण लांबी-६४.५० मीटर   साठवण क्षमता-०.२५२ दलघमी   सिंचन क्षमता-६२ हेक्टर   निधी मंजूर-१२ कोटी ३१ लाख ३९ हजार १८७ रुपये

 गव्हाण कोल्हापुरी बंधारा   बांधकाम-१९९१-९२   एकूण लांबी-६४.५० मीटर   साठवण क्षमता-०.५८४ दलघमी   सिंचन क्षमता-८७ हेक्टर   निधी मंजूर-११ कोटी ४७ लाख ६० हजार १६४ रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com