तिवरे-खडपोली धरण फुटले; २४ जण वाहून गेल्याची भिती, २ मृतदेह सापडले

तिवरे-खडपोली धरण फुटले; २४ जण वाहून गेल्याची भिती, २ मृतदेह सापडले
तिवरे-खडपोली धरण फुटले; २४ जण वाहून गेल्याची भिती, २ मृतदेह सापडले

चिपळूण : तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान २४ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, वाहून गेल्यापैकी २ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले होते. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात होती. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केल्याचेही समजत आहे. 

चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे-खडपोली धरण भरून वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे. यात किमान २४ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. स्थानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी किमान २४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेल्याची भीती आहे. ज्या गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे त्या गावांत सुमारे ३ हजार इतकी लोकवस्ती आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठी घटना असून पुण्यातून आणि सिंधुदुर्ग येथून  एनडीआरएफ ची पथके घटनास्थळी दाखल झाली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.  बाधित गावांमध्ये वालोटी, दळवटने, गाणे, सती, चिंचघरी, खेर्डी, चिपळूण यांचा समावेश आहे. 

एनडीआरएफला पाचारण रत्नागिरी जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री साडेदहाच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. जिल्हाधिकारीही घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. पुणे तसेच सिंधुदुर्गातून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने दिली. ही दुर्घटना अलोरे-शिरगावच्या पोलिस चौकीच्या हद्दीत घडली असून स्थानिक पोलीस सुरुवातीपासूनच युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. तलाठ्यांनी दिला होता इशारा चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे-खडपोली धरण भरून वाहू लागले. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे. यात किमान २४ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. स्थानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी किमान २४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेल्याची भीती आहे. ज्या गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे त्या गावांत सुमारे ३ हजार इतकी लोकवस्ती आहे. आतापर्यंत तीन मृतदेह हाती लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com