गावापासून दूर पुनर्वसनाची तिवरे ग्रामस्थांची पवारांकडे मागणी

गावापासून दूर पुनर्वसनाची तिवरे ग्रामस्थांची पवारांकडे मागणी
गावापासून दूर पुनर्वसनाची तिवरे ग्रामस्थांची पवारांकडे मागणी

चिपळूण, जि. रत्नागिरी : गावापासून दूर पुनर्वसन करण्याची मागणी तिवरे ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.  चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला सोमवारी (ता. ८) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. या वेळी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन करून श्री. पवार यांनी ग्रामस्थांकडून समस्या जाणून घेतल्या. या वेळी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मृतांच्या नातेवाइकांना या वेळी प्रत्येकी १ लाखाचा धनादेश देण्यात आला. श्री. पवार म्हणाले, की आमदार भास्करराव जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार बाधित कुटुंबांना राज्यशासन व केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. धरणफुटीनंतर धरणाचे ठेकेदार शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी श्री. पवार यांच्याकडे करण्यात आली.    या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्करराव जाधव, आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदींसह राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते. दरम्यान, तिवरे धरण २ जुलै रोजी रात्री ९.३०च्या सुमारास फुटले होते. या दुर्घटनेत २४ लोक बेपत्ता झाले होते, त्यापैकी १८ जणांचे मृतदेह सापडले, तर अजूनही ६ जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com