पुणे जिल्ह्यात आज ठिय्या आंदोलन

पुणे जिल्ह्यात आज ठिय्या आंदोल
पुणे जिल्ह्यात आज ठिय्या आंदोल

पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये क्रांतिदिनी (ता. ९) मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचा बंद पुकारण्यात आलेला नाही, परंतु कोणतीही हिंसा न करता बंद पाळल्यास त्याला आमचा विरोध नसेल, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा समन्वयकांनी जाहीर केली आहे.

मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने मंगळवारी (ता. ७) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेला राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, राहुल पोकळे, विराज तावरे, बाळासाहेब आमराळे, उषा पाटील, धनंजय जाधव, दीपाली पाडाळे, सचिन आडेकर आदी उपस्थित होते.

कोंढरे म्हणाले की, शहरातील मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे, तर सर्व तालुक्यातील तहसील कार्यालय येथे सकाळी ११ ते १ या वेळेत ठिय्या आंदोलन करण्याचे निश्‍चित   करण्यात आलेले आहे. शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी उत्स्फूर्त आंदोलने होणार आहेत. तसेच, गुलटेकडी मार्केट यार्ड येथील मार्केट, महात्मा फुले मंडई, तसेच रिक्षा पंचायतीने बंद पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा उत्स्फूर्त बंदला समन्वयकांचा विरोध नाही. मात्र, कोणत्याही प्रकारे सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही व नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजीही घेणे आवश्‍यक आहे.

राज्य सरकारने नोव्हेंबरअखेरपर्यंत मराठा समाजाला संयम बाळगळण्याचे आवाहन केले असले, तरी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज शांत राहणार नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाबाबतची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी औरंगाबाद येथे राज्यातील समन्वयकांची बैठक होणार असून, त्यांनतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे राहुल पोकळे यांनी सांगितले.

शाळा, महाविद्यालयांना सुटी क्रांतिदिनी जिल्ह्यात होणाऱ्या मराठा अांदोलनाच्या पार्श्र्वभूमीवर खबरदारी म्हणून शहर आणि जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये एक दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले अाहेत. यामुळे अपूर्ण राहणारा अभ्यासक्रम सुटीच्या दिवशी पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com