राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणार

बुधवार (ता.१९) पर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून आज (ता.१५) आणि उद्या (ता.१६) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणार
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणार

पुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून गुजरातच्या दक्षिण चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. ही स्थिती अजून दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. बुधवार (ता.१९) पर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून आज (ता.१५) आणि उद्या (ता.१६) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूंपातर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच हरियाणाच्या दक्षिण भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. तर कच्छ व परिसर ते पाकिस्तानचा दक्षिण भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.६ किलो या दरम्यान आहे. याशिवाय उत्तर भारतात असलेला मॉन्सूनचा पट्टा जैसलमेर, जयपूर, ग्वाल्हेर, सिद्दी, दाल्तोगंज, जमशेदपूर ते उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालपर्यत कार्यरत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. कोकणात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उद्या (रविवारी) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  पुणे परिसरातही बुधवारपर्यंत (ता.१९) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com