Agriculture news in Marathi Today is the deadline for grape insurance | Agrowon

द्राक्ष विम्यासाठी आज अंतिम मुदत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन २०२०-२१ मध्ये द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान,गारपीट या समाविष्ट धोक्यांसाठी विमा संरक्षण कालावधी हा १६ ऑक्टोंबर ते ३१ मार्च २०२१ अटी, शर्ती व अधिसूचित फळपिकाच्या हवामान धोके निकर्षानुसार राबविण्यात येत आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन २०२०-२१ मध्ये द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान,गारपीट या समाविष्ट धोक्यांसाठी विमा संरक्षण कालावधी हा १६ ऑक्टोंबर ते ३१ मार्च २०२१ अटी, शर्ती व अधिसूचित फळपिकाच्या हवामान धोके निकर्षानुसार राबविण्यात येत आहे. द्राक्ष पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची मुदत आज (ता.१५) असून अधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी लाभ घेणे ऐच्छिक असून, द्राक्ष फळपिकाचे उत्पादनक्षम वय २ वर्षे व त्यापेक्षा जास्त फळबागांना विमा संरक्षण कवच लागू राहणार आहे. जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. अधिसूचित क्षेत्रात कुळाने, भाडे पट्टीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेत भाग घेता येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही कळविले आहे.

संभाव्य धोक्यानुसार पीकविमा हप्ता
शेतकऱ्यांनी अवेळी पाऊस व कमी तापमान या संभाव्य धोक्यांसाठी भरावयाचा विमा हप्ता १६ हजार प्रति हेक्टरी तसेच व या कालावधीसाठी गारपीट या धोक्यासाठी  विमा रक्कम ५ हजार ३३३ रुपये प्रति हेक्टर अशी आहे. या पैकी दोन्ही बाबतीत शेतकऱ्यांनी भरावयाची एकत्रित विमा रक्कम २१ हजार ३३३ रुपये प्रतिहेक्टर अशी आहे.

हवामान धोके विमा संरक्षण कालावधी
अवेळी पाऊस १६ ऑक्टोबर ते ३१ मार्च
कमी तापमान १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी
गारपीट १ जानेवारी ते ३० एप्रिल

फळपिकाच्या नोंदणीकरिता राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.तरी शेतकऱ्यांनी द्राक्ष फळपिकाच्या हवामान धोक्याची माहिती करून घेऊन नजीकच्या ई-सेवा केंद्र,बॅक,वित्तीय संस्था यांचेशी संपर्क साधून  योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.
- दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...