पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आज शेवटची संधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेण्याची शेवटची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आज शेवटची संधी
पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आज शेवटची संधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेण्याची शेवटची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी (ता. ३१) अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत संपणार असल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे. विवध अभ्यासक्रमांसाठी ३१ हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या आवारात पदव्युत्तर पदवीचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून हजारो विद्यार्थी अर्ज करतात. यंदा कोरोनामुळे विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबात निर्णय होण्यास झालेला विलंब आणि विद्यार्थ्यांकडून होणारी चौकशी यामुळे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रॉक्‍टर्ड प्रणालीचा वापर करून ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.unipune.ac.in संकेतस्थळावरून अर्ज भरावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com