agriculture news in marathi today Maharashtra Vidhan Parishad six seats result | Agrowon

विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक  मतदारसंघातील निवडणुकीसाठी  आज (ता.३) मतमोजणी होत असून, सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक  मतदारसंघातील निवडणुकीसाठी  आज (ता.३) मतमोजणी होत असून, सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदारांचा कौल आजमावण्यात आला. मंगळवारी (ता.१) मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे ६९.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. दिग्गज नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मतदानाचा हक्क बजावला.

कोरोनामुळे यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. धुळे- नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी अमरिश पटेल यांनी राजीनामा देऊन भाजमध्ये प्रवेश केल्याने येथे पोटनिवडणूक होते आहे.  भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या पटेल यांच्यासमोर काँग्रेसच्या आशुतोष पाटील यांचे आव्हान होते. 

महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी दोन तर शिवसेनेने एका जागेवर उमेदवार उभा केला होता. विरोधी भाजप चार जागा लढवीत असून अन्य एका अपक्षाला भाजपने पाठिंबा देऊ केला आहे.

मतदान (प्रमाण टक्क्यांत)
पदवीधर

  • औरंगाबाद : ६१.०८ 
  • पुणे : ५०.३० 
  • नागपूर : ५४.७६ 

शिक्षक मतदारसंघ

  • अमरावती : ८२.९१ 
  • पुणे : ७०.४४ 
  • धुळे-नंदुरबार 

स्था. स्व. संस्था  :  ९९.३१


इतर बातम्या
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...