मराठवाड्यात आज ग्रामपंचायतींसाठी मतदान

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतीसाठी आज (ता. १५) मतदान होत आहे.
Today in Marathwada Voting for Gram Panchayats
Today in Marathwada Voting for Gram Panchayats

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतीसाठी आज (ता. १५) मतदान होत आहे. थेट जनतेतून सरपंच निवडीचा बदलेला निर्णय, सोबतच सरपंचपदासाठीचे आधी घोषित केलेले आरक्षण रद्द करून निवडणूकीनंतर आरक्षण जाहीर करावयाचा निर्णय आदी शासकीय, प्रशासकीय घडामोडीनंतर आता निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांचे भाग्य या मतदानातून मतपेटीत बंद होणार आहे. 

मराठवाड्यातील ४१३४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी ४१३३ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या मराठवाड्यातील ग्रामपंचायतीपैकी ३८८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीमंध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६१७, बीड १२९, नांदेड १०१५, उस्मानाबाद ४२८, परभणी ५६६, जालना ४७५, लातूर ४०८ तर हिंगोली जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतीं आहेत.  या सर्व ग्रामपंचायतींपैकी जवळपास ३८८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३५, लातूर २५, नांदेड १०६, परभणी ६६, हिंगोली ७३, जालना २६, बीड १८ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ३९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

प्रत्यक्ष मतदान मतमोजणीनंतर सर्वच चित्र स्पष्ट होणार आहे. डोअर टू डोअर प्रचार, रॅली, पत्रक, जाहीरनामा,  स्टिकर, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार तसेच भावकी-गावकीचं जुगाड जमवून आपली बाजू भक्‍कम करण्याचा प्रयत्न निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराने केला. 

यंत्रणा सज्ज

आज (ता.१५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान प्रत्यक्ष मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा मतदानाच्या प्रक्रियेसाठी सज्ज आहे.  सोमवारी (ता.१८) प्रत्यक्ष मतमोजणीअंती प्रचारात तुल्यबळ व रंजक वाटणाऱ्या विविध ग्रामपंचायत निवडणूकीतील जय-पराजयाचे चित्र स्पष्ट होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com