Agriculture news in Marathi, Today Voting at 6,990 centers in Nanded, Parbhani and Hingoli districts | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५ हजार ४६९ केंद्रांवर आज मतदान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ मतदारसंघातील ५ हजार ४६९ मतदान केंद्रांवर सोमवारी (ता. २१) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया घेण्यात येणार असून, एकूण ४८ लाख ५५ हजार ३७० मतदार निवडणुकीस उभे असलेल्या २२० उमेदवारांच्या भवितव्यांचा निर्णय घेतील. 

नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ मतदारसंघातील ५ हजार ४६९ मतदान केंद्रांवर सोमवारी (ता. २१) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया घेण्यात येणार असून, एकूण ४८ लाख ५५ हजार ३७० मतदार निवडणुकीस उभे असलेल्या २२० उमेदवारांच्या भवितव्यांचा निर्णय घेतील. 

बहुतांश ठिकाणी महायुती आणि महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवारांमध्ये तिरंगी लढती होतील. प्रभावी बंडखोर असलेल्या मतदारसंघात अटीतटीच्या लढती होतील. गुरुवारी (ता.२४) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. प्रमुख उमेदवारांमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भोकर), आमदार डी. पी. सावंत (नांदेड दक्षिण), आमदार वसंतराव चव्हाण (नायगाव), माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर (पाथरी), आमदार डॉ. संतोष टारफे (कळमनुरी), राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे (जिंतूर), डॉ. मधुसूदन केंद्रे (गंगाखेड), प्रदीप नाईक (किनवट), भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे (हिंगोली), तुषार राठोड (मुखेड), शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा (वसमत), नागेश पाटील आष्टीकर (हदगाव), सुभाष साबणे (देगलूर), डॉ. राहुल पाटील (परभणी), अपक्ष आमदार मोहन फड (पाथरी) आदींचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघात एकूण २५ लाख ४६ हजार ६०४ मतदार असून २ हजार ९६२ मतदान केंद्र आहेत. एकूण १३४ उमेदवार उभे आहेत. यामध्ये किनवट मतदारसंघात १५ उमेदवार, हदगाव मतदासंघात १५ उमेदवार, भोकर मतदारसंघात ७ उमेदवार, नांदेड उत्तर मतदारसंघात २४ उमेदवार, नांदेड दक्षिण मतदारसंघात ३८ उमेदवार, लोहा मतदारसंघात १० उमेदवार, नायगाव मतदारसंघात ११ उमेदवार, देगलूर मतदारसंघात ९ उमेदवार आहेत. मुखेड ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

परभणी जिल्‍ह्यातील ४ विधानसभा संघातील १३ लाख ९९ हजार ५६२ मतदार असून १ हजार ५०६ मतदान केंद्र आहेत. चार मतदारंसघात एकूण ५३ उमेदवार आहेत. हिंगोली जिल्ह्यात तीन मतदारसंघात ९ लाख ९ हजार २०४ मतदार असून १ हजार १ मतदान केंद्र असून ३३ उमेदवार आहेत.


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगेपुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...