घोडगंगाच्या सहवीज प्रकल्पाचे आज उद्‌घाटन

घोडगंगाच्या सहवीज प्रकल्पाचे आज उद्‌घाटन
घोडगंगाच्या सहवीज प्रकल्पाचे आज उद्‌घाटन

शिरूर, जि. पुणे : तालुक्‍यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने अनंत अडचणींचा सामना करीत महत्त्वाकांक्षी सहवीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. आज (ता. १६) या प्रकल्पाचे शानदार उद्‌घाटन न्हावरे (ता. शिरूर) येथे कारखाना कार्यस्थळावर होत आहे. काटकसरीतून, कमी खर्चात उभा राहिलेला हा प्रकल्प आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी दुपारी तीन वाजता या प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, घोडगंगाचे अध्यक्ष, माजी आमदार ॲड. अशोक पवार आदी उपस्थित राहणार आहेत. कारखान्याने आसवनी प्रकल्प, उपपदार्थ निर्मिती व आता सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. 

या प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पदरात अधिकचे पैसे पडणार आहेत. शासनाच्या बदललेल्या धोरणांमुळे वीजखरेदी करार लांबणीवर पडल्याने व तयार होणाऱ्या विजेला कमी पैसे येत असल्याने कारखान्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com