agriculture news in marathi, Today's poll for Raver, Jalgaon | Agrowon

रावेर, जळगावसाठी आज मतदान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील प्रचारतोफा रविवारी (ता. २१) सायंकाळी थंडावल्या. मंगळवारी (ता. २३) सकाळी ७ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथील मतदान होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी प्रशासनाने केली आहे. 

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील प्रचारतोफा रविवारी (ता. २१) सायंकाळी थंडावल्या. मंगळवारी (ता. २३) सकाळी ७ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथील मतदान होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी प्रशासनाने केली आहे. 

रावेरात भाजपच्या रक्षा खडसे, काॅँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत आहे. बहुजन वंचित आघाडीचे नितीन कांडेलकरही मैदानात आहेत. जळगावात भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी काॅँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात थेट लढत होईल. बहुजन वंचित आघाडीच्या अंजली बाविस्करही रिंगणात आहेत. प्रचारात भाजपने देशाच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार उचलला, तर महाआघाडीने ''गरिबी हटावो, मोदी हटावो''चा नारा अनेकदा दिला. महायुतीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रचारसभा घेतल्या. महाआघाडीतर्फे राष्ट्रवादी काॅँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांनी प्रचार केला. 

महाआघाडीसह महायुतीच्या उमेदवारांनी सोमवारी गुप्त बैठका, भेटीगाठींवर भर दिला. जिल्ह्यातील १० टक्के मतदान केंद्रांचे वेबकास्‍टिंग केले जाईल. त्यात मतदान सुरू होण्यापूर्वी व मतदानाची वेळ पूर्ण होईपर्यंत चित्रीकरण होईल. दोन्ही मतदारसंघांत एकूण तीन हजार ६१७ मतदान केंद्र आहेत. २६ हजार १३६ कर्मचारी नियुक्त आहेत. सहा हजार ९१ पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत. एकूण मतदार ३४ लाख ३१ हजार ४८५ आहेत. 

महिलांसाठी विविध ११ ठिकाणी सखी मतदान केंद्रे असतील. ११ केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार करण्यात आली आहेत. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असेल. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन नेणाऱ्या ६०६ वाहनांना जीपीएस सिस्‍टिम लावण्यात आली आहे. यामुळे संबंधित वाहने मतदान केंद्रात केव्हा पोचली, कुठे थांबली याची नेमकी माहिती मिळू शकेल.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...