तोलणार काट्यावर नसताना तोलाई कपात कशाला?

काम न करता तोलाई कपात करणे हा गुन्हा आहे. काम केले नसेल तर पगारपण देण्यात येऊ नये. ही आमची मागणी आहे. तोलणार काट्यावर उपस्थित असल्याबाबत बाजार समित्यांनी कडक भूमिका घ्यावी. - रघुनाथदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना
tolnar
tolnar

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे-भाजीपाला विभागात ९२७ गाळे आणि १ हजार १८० इलेक्ट्रॉनिक वजन काटे असताना, यावर केवळ २८०च  तोलणार कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वच शेतमालाची नोंद तोलाई होत नसताना शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीमधून लाखो रुपयांची तोलाई कपात बेकायदा ठरत आहे, ती त्वरित बंद करण्याची मागणी शेतकरी संघटनेनी केली आहे.   बाजार समिती आवारातील शेतमालाच्या खरेदी-विक्रीदरम्यान वजनमापांमध्ये तफावत होऊन, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तोलणाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तोलणारांकडून केवळ काट्यावर झालेल्या वजनाची नोंद घेण्याचे काम असते, मात्र पणन सुधारणांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर बिनचूक तोलाई होत असताना, वजनाची नोंद घेणाऱ्या तोलणाऱ्यांची गरजच नसल्याने, शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीमधून तोलाई कपात करू नये, असे पणन संचालकांचे भुसार विभागासाठी आदेश आहेत. आता हे आदेश फळे-भाजीपाला विभागातदेखील लागू करण्याची मागणी होत आहे.   बाजार समितीमधील फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा या विभागांमध्ये सुमारे ९२७ गाळे आहेत. तर १ हजार १८० इलेक्ट्रॉनिक काटे असून, २८० तोलणार कार्यरत आहेत. कायद्यानुसार एका वजन काट्यावर एक तोलणार वजनाच्या नोंदी घेण्यासाठी उपस्थित असणे बंधनकारक आहे. मात्र जे तोलणार आहेत, ते देखील उपस्थित नसल्याचे आणि सर्वच शेतमालाची नोंद तोलणार घेत नाहीत. मात्र शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीमधून न केलेल्या तोलाईच्या कामाचे पैसे आडतदार माथाडी मंडळात भरतात. ते पैसे तोलणारांना मिळतात. त्यामुळे न केलेल्या कामाचे कसले पैसे तोलणारांना द्यायचे, असा प्रश्‍न शेतकरी आणि शेतकरी संघटना उपस्थित करत आहेत. 

हजेरी लावून चालवतात रिक्षा ‘अनेक तोलणार बाजार समितीमध्ये येऊन हजेरी लावतात. नंतर मूळ काम न करता रिक्षा, टेम्पो चालविण्याचा व्यवसाय करतात, त्यांची तपासणी केल्यास ही माहिती समोर येईल,’ असे येथील सूत्रांनी सांगितले.  प्रतिक्रिया बाजार आवारात शेतमाल आल्यावर तत्काळ वजन व्हावे, अशी आमची मागणी आहे. तसे झाल्यास सर्व शेतमालाचे वजन आहे त्या तोलणारांमध्ये करणे शक्य आहे. मात्र वाहने गाळ्यावर गेल्यावर विक्री होताना वजन होते. आमची दोन तीन शिफ्टमध्ये काम करण्याची देखील तयारी आहे. याबाबत बाजार समिती प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे.  - राजेश मोहोळ, सचिव, तोलणार संघटना, पुणे बाजार समिती  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com