Agriculture news in Marathi Toleran's dam movement at Gultekdi | Agrowon

गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

भुसार व्यापारी ‘तोलणारां’ना कामावर रुजू करून घेत नाही. याच्या निषेधार्थ हमाल पंचायतीच्या वतीने ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली तोलणारांनी सोमवारी (ता. २६) बाजार समितीच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.

पुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार विभागातील पॅकिंग शेतीमालावर तोलाई आकारू नये, हे परिपत्रक रद्द झाल्यानंतर आणि बाजार समितीचे कामावर रुजू करून घेण्याचे आदेश असतानाही, भुसार व्यापारी ‘तोलणारां’ना कामावर रुजू करून घेत नाही. याच्या निषेधार्थ हमाल पंचायतीच्या वतीने ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली तोलणारांनी सोमवारी (ता. २६) बाजार समितीच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.

याबाबत डॉ. आढाव म्हणाले, की तोलणार हा बाजार समितीमधील शेतीमालाच्या वजनकाट्यावरील महत्त्वाचा घटक असताना देखील भुसार व्यापारी संघटना त्यांना कामावर घेत नाही. गेले तीन महिने तोलणारांना काम नसून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने पॅकिंग शेतीमालावरील तोलाई कपात करू नये, हे पणन संचालकांचे परिपत्रक रद्द केले असले, तरी व्यापारी राज्य शासनाचा आणि बाजार समितीच्या परिपत्रकाची पायमल्ली करत आहे. त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करत, तोलणारांचे काम पूर्ववत करावे. अन्यथा, हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी कामगार संघटनेचे संतोष नांगरे, हनुमंत बहिरट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रकरण न्यायप्रविष्ट
सुट्या मालाच्या तोलाईला विरोध नाही. तोलाई संदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रविष्ट असताना, तोलणारांनी आंदोलन करणे चुकीचे आहे. येत्या २९ आॅक्टोबर रोजी सुनावणी असून, न्यायालय जो आदेश देईल, तो आम्हाला मान्य असेल. असे पूना मर्चटस चेंबरचे अध्यक्ष पोपटशेठ ओस्तवाल यांनी सांगितले. तर चेंबरने बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुट्या अन्नधान्याच्या तोलाईला विरोध केलेला नाही. तसे परिपत्रक देखील चेंबरने काढलेले आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा...एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीड...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
परभणीत दीड लाख क्विंटल कापसाची खरेदीपरभणी :  भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (...
जळगाव जामोदमध्ये कापूस खरेदी सुरूबुलडाणा : कापूस पणन महासंघाच्या वतीने हमी भाव...
सटाणा तालुक्यात चार कोटींची नुकसानभरपाई...नाशिक  : सटाणा तालुक्यात ऑक्टोबर आणि...
भंडाऱ्यात ३४ कोटींची धान खरेदीभंडारा  : जिल्ह्यात आधारभूत दराने धान...
निम्न दुधानाचे बुधवारपासून आवर्तनपरभणी  : जिल्ह्यातील ब्रम्हवाकडी (ता. सेलू)...
भातपिकासह ट्रॅक्टर जळून खाकअस्वली स्टेशन, जि. नाशिक : इगतपुरी...
नगर जिल्ह्यात कांदा बियाण्याची टंचाईनगर (प्रतिनिधी) : नगर जिल्ह्यात यंदा खरीप व रब्बी...
ढगाळ वातावरणामुळे उसावर तांबेरासोमेश्वरनगर, जि. पुणे ः अतिवृष्टीपाठोपाठ आलेल्या...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
बुलडाणा : कांद्याचे निकृष्ट बियाणे...बुलडाणा : मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या...
रब्बीसाठी पहिले आवर्तन पाच डिसेंबरला ः...जळगाव : ‘‘रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन...
धुळे जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात होणार...कापडणे, जि. धुळे : जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने...
कुंभार पिंपळगावात आगीत चार एकर ऊस खाककुंभार पिंपळगाव, जि.जालना : राजाटाकळी- अरगडे...
द्राक्ष निर्यातवाढीसाठी शासन सहकार्य...अंतापूर, ता. सटाणा : ‘‘द्राक्षाचा पीकविमा बाराही...
कपाशी पिकातील फरदड घेणे टाळा : डॉ. पवारअंबड, जि. जालना : ‘‘मराठवाड्यात कपाशीच्या...
मेथी उत्पादनाचा खर्च ४४०० आणि मिळाले...येवला  : महिन्यापूर्वी २५ ते ३० रुपयांना...
कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करा; `...नाशिक : ‘‘रात्रीच्या वेळी पाणी देताना होणारी...