Tolvatolvi of officials on the issue of damage at Khed
Tolvatolvi of officials on the issue of damage at Khed

खेड येथे नुकसानीच्या प्रश्‍नांवर अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांचे पंचनामे करताना बांधांवरची झाडे आणि विहीरींच्या पंचनाम्यांचे आदेश देऊनही ते करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांचे पंचनामे करताना बांधांवरची झाडे आणि विहीरींच्या पंचनाम्यांचे आदेश देऊनही ते करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्याबाबत टोलवाटोलवी केली. त्यामुळे खेड येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी संतप्त शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत सुनावले.

खेड तालुक्यातील खरीप पूर्व हंगाम, शिक्षण बांधकाम, अंगमवाडी, छोटे पाटबंधारे, नळपाणीपुरवठा, पशुसंवर्धन वीजवितरण कंपनी, महसूल आदी विभागाअंतर्गत कामांची सध्याची स्थिती आणि निधीबाबत अपूर्ण कामांचा, कोरोनाबाबतील उपाययोजना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे यांच्या आढाव्याची बैठक खेड पंचायतीत घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती अरगडे, सदस्य तनुजा घनवट, शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, भगवान पोखरकर,चांगदेव शिवेकर, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. गाढवे आदी उपस्थित होते.

 निसर्ग चक्रीवादळात खेड तालुक्यात नुकसानीच्या आढाव्यात सात बारा उताऱ्यांवर फळझाडे, विहरींच्या नोंदी नाहीत. त्यामुळे कृषी व महसूल, ग्रामसेवकांनी पंचनामे केले नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी शासन आदेशाचा कित्ता गिरवला. संतप्त पदाधिकाऱ्यांनी, पालकमंत्र्यांनी वरिष्ठांना आदेश दिले होते. तरी ते झाले नाही. यापुढे पंचनामे केले नाही, तर याबाबत कार्यवाही करण्याचा सज्जड दम उपाध्यक्षांनी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडे बोट दाखवले.

    कृषी विभागाकडून तक्रारींकडे दुर्लक्ष

तालुक्यात बी. बियाणे, खतांची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीबाबत कृषी विभागाकडून दखल घेतली जात नाही. तसेच आधार कार्डावर एकाच शेतकऱ्याला ७० ते ८० खतांच्या गोण्या दिल्याचे जिल्हा परिषद सदस्यांनी निदर्शनास आणले. तर, सोयाबीन न उगवल्याच्या शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीबाबत कारवाई केली नसल्याने यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com