राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२०० रुपये

राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२०० रुपये
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२०० रुपये

सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोच्या आवक आणि दरात पुन्हा घट राहिली. पण त्याचे दरही स्थिरच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गतसप्ताहात बाजार समितीच्या आवारात टोमॅटोची आवक रोज एक ते दीड टनांपर्यंत राहिली. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. पण दर काहीसे स्थिरच आहेत. टोमॅटोची आवक स्थानिक भागातून आहे. पण नजीकच्या पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर भागांतूनही होते आहे. या सप्ताहात टोमॅटोला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक ८०० रुपये इतका दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही अशीच परिस्थिती होती. प्रतिदिन ५०० ते ७०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. तर दर प्रतिक्विंटल किमान २५० रुपये, सरासरी ४५० रुपये आणि सर्वाधिक ७५० रुपये मिळाला. त्या आधीच्या सप्ताहात काहीसा बाजार वधारला. पण तो फारसा फरक दाखवणारा नव्हता. आवक फक्त प्रतिदिन एक ते दोन टनांपर्यंत राहिली. तर दर किमान ३०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक ९०० रुपये असा मिळाला.

पुणे बाजारात प्रतिक्विंटल ५०० ते १००० पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १३) टोमॅटोची सुमारे चार हजार क्रेटस आवक झाली होती. या वेळी दहा किलोला सुमारे ५० ते १०० रुपयांपर्यंत दर होते. आवक आणि दर सरासरी असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

जळगावात प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये जळगाव ः कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते ८०० आणि सरासरी ६०० रुपये दर मिळाला. गुरुवारी (ता. १३) २२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली.  आवक पाचोरा, जामनेर, यावल, सिल्लोड (जि. औरंगाबाद), सोयगाव (जि. औरंगाबाद) भागातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. परंतु दर समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महिनाभरापासून दर ११०० रुपयांवर गेलेले नाहीत. याचा फटका उत्पादकांना होत असल्याचे सांगितले जात आहे. 

परभणीत प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये  परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १३) टोमॅटोची ८०० क्विंटल आवक होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या महिनाभरात प्रत्येक गुरुवारी ४५० ते ८०० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते ८०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १३) टोमॅटोची ८०० क्विंटल आवक झाली असतांना घाऊक विक्रीचे दर ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल होते. तर किरकोळ विक्री ८ ते १० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सांगलीत प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये सांगली : येथील शिवाजी मंडईत टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १३) टोमॅटोची ३०० ते ३५० क्रेटची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १०० ते १२० रुपये असे दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शिवाजी मंडईत टोमॅटोची सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस, खानापूर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, शिरोळ येथे आवक होते. गत सप्ताहात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे दर कमी होते. गुरुवारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोच्या दरात प्रति दहा किलोस ४० ते ५० रुपयांनी दर वाढले आहेत.  बुधवारी (ता. १२) टोमॅटोची ५०० ते ६०० क्रेटची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ५० ते ६० रुपये असे दर होते. मंगळवारी (ता. ११) टोमॅटोची ६०० ते ७०० क्रेट आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ५० ते ६० रुपये असा दर मिळाला. चालू सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत घट होण्याची शक्यता असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते ६०० रुपये  औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १३) टोमॅटोची १२५ क्‍विंटल आवक झाली. या टोमॅटोला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १७ नोव्हेंबरला ८५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २२ नोव्हेंबरला २०५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला २०० ते ३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६ नोव्हेंबरला १९५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला २५० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ नोव्हेंबरला १४८ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ डिसेंबरला ९७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ डिसेंबरला १४४ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ३०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८ डिसेंबरला १३० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला २०० ते ३५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० डिसेंबरला १७२ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ डिसेंबरला १५९ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नगरला प्रतिक्विंटल ४०० ते १२०० रुपये नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची काहीशी आवक कमी झाली आहे. आज गुरुवारी (ता. १३) बाजार समितीत ९४ क्विंटलची आवक होऊन ४०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दरातही काहीशी वाढ झाली आहे.  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची जिल्हाभरातून आवक होत असते. या सप्ताहात मात्र आवक कमी झाली आहे. ६ डिसेंबरला ११० क्विंटलची आवक होऊन ४०० ते १२०० रुपये व सरासरी ८०० रुपये दर मिळाला. २९ नोव्हेंबरला २८० क्विंटलची आवक होऊन २०० ते १००० रुपये व सरासरी ६०० रुपये दर मिळाला. २२ नोव्हेंबरला २१० क्विंटलची आवक होऊन ४०० ते ९०० रुपये व सरासरी ६५० रुपये दर मिळाला. १५ सप्टेंबरला १७५ क्विंटलची आवक होऊन २०० ते ७०० रुपये व सरासरी ५५० रुपये दर मिळाला. ६ डिसेंबरला ११० क्विंटलची आवक होऊन ४०० ते १२०० रुपये व सरासरी ८०० रुपये दर मिळाला. ८ सप्टेंबरला १८३ क्विंटलची आवक होऊन २०० ते ९०० रुपये व सरासरी ५०५ रुपये दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नागपुरात प्रतिक्‍विंटल ७०० रुपये नागपूर ः कळमणा बाजार समितीत टोमॅटोची आवक १५० ते २०० क्‍विंटलवर स्थिरावली आहे. आवक स्थिरावली असतानाच दरात मात्र मोठे चढउतार होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री १० ते १५ रुपये किलोप्रमाणे होत आहे.  कळमणा बाजार समितीत १ डिसेंबर रोजी १२० क्‍विंटल टोमॅटो आवक नोंदविण्यात आली. ८०० ते १००० रुपये क्‍विंटलने टोमॅटोचे व्यवहार झाले. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी टोमॅटोची आवक १६० क्‍विंटलवर तर दर १००० ते १५०० रुपये क्‍विंटलवर पोचले. दरात तेजीचा अनुभव शेतकरी घेत असताना सहा डिसेंबर पासून हेच दर ६०० ते ८०० रुपये क्‍विंटलवर आल्याची माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. ५०० ते ७०० रुपये क्‍विंटलचा दर १० डिसेंबर रोजी होता. त्यानंतर ६०० ते ८०० व आता परत ५०० ते ७०० रुपये क्‍विंटलने टोमॅटोचे व्यवहार आहेत. आवक मात्र १५० ते २०० क्‍विंटल अशी स्थिर आहे.

साताऱ्यात प्रतिक्विंटलला ५०० ते १००० सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १३) टोमॅटोची ४७ क्विंटल आवक झाली. टोमॅटोस क्विंटलला ५०० ते १००० असा दर मिळाला आहे. टोमॅटोचा दर अनेक दिवसांपासून स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. फलटण, कोरेगाव, सातारा या तालुक्यातून टोमॅटोची बहुतांशी आवक होत आहे. रविवारी (ता. ९) टोमॅटोची ६४ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ६०० ते ८०० असा दर मिळाला होता. गेल्या गुरुवारी (ता. ६) टोमॅटोची ९३ क्विंटल आवक होऊन ७०० ते १२०० क्विंटलला दर मिळाला होता. २९ नोव्हेंबरला ५८ क्विंटल आवक होऊन ४०० ते ६०० असा दर मिळाला आहे. टोमॅटोची १० ते १५ रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com