Agriculture news in Marathi Tomato auction begins at Lasalgaon market committee | Agrowon

लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास सुरुवात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू. भगरीबाबा धान्य भाजीपाला मुख्य बाजार आवारात चालू हंगामातील टोमॅटो लिलाव सोमवारी (ता. २) सुरू झाले आहेत. लिलावाचे दिवशी एकूण १७९० क्रेट्स टोमॅटो विक्रीस आले.

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू. भगरीबाबा धान्य भाजीपाला मुख्य बाजार आवारात चालू हंगामातील टोमॅटो लिलाव सोमवारी (ता. २) सुरू झाले आहेत. लिलावाचे दिवशी एकूण १७९० क्रेट्स टोमॅटो विक्रीस आले. कमीत कमी १५१, जास्तीत जास्त ६०१, तर ३४१ रुपये सरासरी प्रति क्रेट्स भाव मिळाला.  

बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, टोमॅटो व्यापारी शिवाजी जगताप, भगवान सरोदे, बापू धरम यांच्या हस्ते टोमॅटो क्रेट्सचे विधीवत पूजन करण्यात आले. मुहूर्तावर वाहेगांव साळ (ता. चांदवड) येथील शेतकरी प्रशांत धोंडीराम लुकारे यांचा टोमॅटो हा शेतीमाल ६०१ प्रति क्रेट्स या दराने बागवान फ्रूट कंपनी यांनी खरेदी केला. सुवर्णा जगताप म्हणाल्या, की लासलगाव बाजारपेठ कांद्याबरोबर टोमॅटो, डाळिंब व भाजीपाल्यासाठीही नावारूपास येत आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावे म्हणून टोमॅटो खरेदीदार, निर्यातदार, व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्यावर बाजार समितीचा भर राहणार असून, लिलावानंतर शेतकऱ्यांना तातडीने रोख चुकवती केली जाणार आहे. 

तसेच टोमॅटो लिलावात नव्याने सहभागी होऊ इच्छीणाऱ्या खरेदीदार तसेच निर्यातदार, व्यापाऱ्यांनी परवान्यासाठी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी टोमॅटो व्यापारी मच्छिंद्र काळे, फहीम अब्दुल बारी मोमीन, हैदर पठाण, सागर आहेर, संजय साळुंके, तनवीर शेख, सचिन देशमुख, सुधीर मोरे, शरद हिरे, नंदकिशोर व्यास, अशोक नेटारे, दीपक केदारे, बाजार समितीचे सहायक सचिव अशोक गायकवाड, सर्व लिलाव प्रमुख सुनील डचके, प्रभारी हिरालाल सोनारे, पंकज होळकर, नामदेव बर्डे, दिगंबर कासव, प्रमोद कुलकर्णी यांच्यासह टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टोमॅटो उत्पादकांनी आपला टोमॅटो शेतीमाल मोठा, मध्यम, लहान (गोल्टी), बदला (बिलबिला, तडकलेला, खरचटलेला) अशी योग्य प्रतवारी करून २० किलोच्या क्रेट्समध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले.
 


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...