agriculture news in marathi, tomato crop damage due to rain, pune, maharashtra | Agrowon

प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील टोमॅटो उत्पादकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

टोमॅटो पीक भांडवली पीक आहे. प्रतिकूल हवामानामुळे टोमॅटोचे पीक काळे पडून नुकसान झाले आहे. बहुतेक टोमॅटो उत्पादकांचा उत्पादन खर्चसुद्धा वसूल झालेला नाही. टोमॅटोचा पावसाळी हंगाम वाया गेला आहे. निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राजकीय नेत्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष आहे.

- राजेंद्र वाजगे, टोमॅटो उत्पादक

नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून असलेले ढगाळ हवामान व जुलै महिन्यात सलग आठ ते दहा दिवस झालेला पाऊस यामुळे टोमॅटोची पाने व फळे काळी पडून जुन्नर तालुक्‍यातील उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे टोमॅटोचा तोडणी हंगाम या वर्षी एक महिना अगोदरच संपुष्टात आला आहे. टोमॅटो बागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी व शिवतेज फार्मर्स ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. 

दरम्यान, जुन्नर तालुक्‍यात मार्च ते जूनदरम्यान दोन टप्प्यात सुमारे पंधरा हजार एकर क्षेत्रात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. उन्हाळी हंगामात पाणी टंचाईचा, तर पावसाळी हंगामात संततधार पावसाचा फटका टोमॅटो बागांना बसला. यामुळे टोमॅटो उत्पादनात साठ ते सत्तर टक्के घट झाल्याने या वर्षी टोमॅटोला जास्त भाव असूनदेखील भांडवली खर्च वसूल झाला नाही. टोमॅटो हे भांडवली पीक आहे. टोमॅटो उत्पादनासाठी खते, ठिबक, मल्चिंग, कीटक व बुरशी नाशके, बाग उभारणी आदींसाठी मोठा खर्च येतो. एकरी तीस टन उत्पादन निघणे अपेक्षित असताना दुसऱ्या टप्प्यात मे अखेर लागवड केलेल्या टोमॅटोचे चार ते सहा टन उत्पादन निघाले.

तालुक्‍यात २६ जुलैपासून सलग दहा दिवस पाऊस झाला. सूर्यप्रकाशाचा अभाव, संततधार पाऊस, ढगाळ हवामान यामुळे बागेतील टोमॅटो पीक वाढीवर परिणाम झाला. परिपक्व फळांना चिरा पडल्या. पाने व कोवळी फळे काळी पडून गळ झाली. तालुक्‍यात टोमॅटोचा तोडणी हंगाम एप्रिल ते ऑगस्टदरम्यान भरात असतो. सततच्या पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाल्याने या वर्षी टोमॅटोचा तोडणी हंगाम एक महिना अगोदरच संपुष्टात आला आहे. 

याबाबत जुन्नर बाजार समितीचे उपसचिव शरद घोंगडे म्हणाले, की जुलै ते ऑगस्टदरम्यान येथील टोमॅटो उपबाजारात रोज सुमारे तीस ते चाळीस हजार टोमॅटो क्रेटची आवक होत असते. नुकसान झाल्याने सद्यःस्थितीत उपबाजारात रोज दहा ते अकरा हजार टोमॅटो क्रेटची आवक होत आहे. अपेक्षित आवक होत नसल्याने उपबाजारातील बहुतेक टोमॅटो व्यापारी निघून गेले आहेत. 

दिवसभरात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या आदिवासी भागातील सत्तर गावांतील भात, भुईमूग पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पाच हजार हेक्‍टर क्षेत्रातील भात, भुईमूग पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मध्य व पूर्व भागातील फळबागा, टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, झालेले पर्जन्यमान शासकीय अटी व शर्थीत बसत नसल्याने टोमॅटो व फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार नाहीत, असे तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात...सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-...
सांगली जिल्ह्यात शेत, पाणंद रस्त्यांचे...लेंगरे, जि. सांगली : शेत आणि पाणंद रस्त्यांचे...
पाणीवाटप संस्थेद्वारे मिळणार ‘ताकारी’चे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ...
मका संशोधन केंद्राचे भिजत घोंगडेऔरंगाबाद : कार्यकारी परिषदेच्या ठरावानंतर...