agriculture news in marathi tomato crop damage nashik maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५० टक्क्यांपर्यंत नुकसान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

टोमॅटोच्या फळांचा लिंबासारखा आकार होत असताना, फळांवर डाग पडायला सुरुवात झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागवडी झाल्या. मात्र आता शेवटचे खुडे होणार नसल्याने उत्पादन घटणार आहे. त्यामुळे चालू वर्षी मोठे नुकसान झाले आहे. 
- प्रफुल पवार, टोमॅटो उत्पादक, वणी खुर्द, ता. दिंडोरी, जि. नाशिक.

नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५३ हजार ४०० हेक्टरवरील भाजीपाला पिके पावसामुळे बाधित झाली आहेत. यात टोमॅटोचाही समावेश असून, पिकाचे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे .

ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीत जिल्ह्यात टोमॅटो लागवड करण्यात आली. साधारणतः डिसेंबरपर्यंत टोमॅटो काढणी हंगाम चालतो. मात्र अनेक ठिकाणी टोमॅटो पीक पावसाच्या तडाख्यात सापडले. त्यामुळे पुनर्लागवडी कराव्या लागल्या. सततच्या पावसामुळे भुरी, लवकर व उशिरा येणारा करपा या रोगांसह नाग अळीचा प्रादुर्भाव या पिकावर झाला.

त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील पूर्व व पश्चिम भाग, चांदवड तालुक्यातील पश्चिम भाग, निफाडचा पूर्व भाग व नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. काही ठिकाणी अनेक शेतकरी दुहेरी फुटवा घेऊन टोमॅटो उत्पादन घेतात. मात्र सकाळी दव व धुके वाढत असल्याने या पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. 

तापमानातील बदलामुळे झाडे तणावात आहेत. करप्यामुळे पाने खराब होऊन गळून पडली. त्यामुळे  फुलकळ्यांची मोठ्या प्रमाणावर गळ झाली. फळे पण खराब होत असून डाग पडले आहेत. फळांची फुगवण होत नाही. पावसामुळे नवी फळे बाधित झाल्या आहेत. फुलगळ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. जिल्ह्यात टोमॅटोचे सर्वसाधारण एकरी १२०० क्रेट उत्पादन असते. मात्र प्रतिकूल हवामानाच्या फटक्यामुळे सध्या हे उत्पादन ५०० क्रेटपेक्षा कमी येत आहे. सध्या निघत असलेल्या फुलकळ्या सततच्या दव व धुक्यामुळे खराब होत आहेत. त्यामुळे उत्पादन हाती येण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आहेत. अजून तरी किमान एक महिना टोमॅटो तोडे चालणे अपेक्षित होते, मात्र रोगांमुळे संपूर्ण पीक बाधित होत आहे. परिणामी, टोमॅटो उत्पादक हवालदिल झाले आहेत.
 

प्रतिक्रिया
टोमॅटो पिकासाठी भरपूर खर्च केला, चांगल्या उत्पादनाची अपेक्षा मातीमोल झाली. पावसामुळे टोमॅटो पीक खराब झाले आहे. तडे जाऊन ५० टक्के माल खराब झाला आहे.
- राजू निफाडे, शिरवाडे वणी, ता. निफाड, जि. नाशिक. 

सध्याच्या प्रतिकूल वातावरणामुळे टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहेत. काही भागात किडींचाही प्रादुर्भाव झाला आहे. कीड,रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे तपासून तज्ज्ञांच्या सल्यानेच उपाययोजना कराव्यात. 
- तुषार उगले, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्र विभाग, के के वाघ कृषि महाविद्यालय,नाशिक
 
असे आहे टोमॅटोचे नुकसान 

  • सततच्या पावसामुळे मुळ्याची सड होऊन झाडे बाधित.
  • उत्पादनात ५० टक्के घट शक्य.
  • सततच्या पावसामुळे फळांना तडे.
  • फुलकळी गळ, फळांना काळे डाग.
  • करपा अधिक असल्याने पानांची गळ.
  • एकरी उत्पादन खर्च सुमारे २५ हजारांनी वाढला.

इतर बातम्या
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...