नाशिक जिल्ह्यात टोमॅटो लागवडीसह वाढला रोगांचा प्रादुर्भाव

नाशिक : जिल्ह्यात टोमॅटोच्या लागवडी दोन वर्षांच्या तुलनेत यंदा २,६२७ हेक्टरने वाढल्या आहेत. आता सततचा पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
 tomato cultivation and diseases increased in Nashik district
tomato cultivation and diseases increased in Nashik district

नाशिक : जिल्ह्यात टोमॅटोच्या लागवडी दोन वर्षांच्या तुलनेत यंदा २,६२७ हेक्टरने वाढल्या आहेत. तर, धुळे जिल्ह्यात ते क्षेत्र निम्म्यावर, तर जळगावमध्येही लक्षणीय घट दिसून आली. नंदुरबार जिल्ह्यात तर क्षेत्र थेट शून्यावर आले आहे. सुरुवातीला भांडवल नसतानाही नाशिकमध्ये लागवडी झाल्या. मात्र आता सततचा पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

सुरुवातीला मे महिन्यात टोमॅटो पिकावरील विषाणूजन्य रोगांबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या. त्यामुळे पूर्व हंगामी टोमॅटो लागवडी मोठ्या प्रमाणावर घटल्या. तर, नंतरच्या टप्प्यात होणाऱ्या नागपंचमी दरम्यान खरीप लागवडीखालील क्षेत्र वाढले. एकंदरीत उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास इतर जिल्ह्यातील घटलेली क्षेत्रातील तफावत नाशिक जिल्ह्याने कमी केली आहे. मात्र, या भागात रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन व गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

रोगराई ठरतेय अडचणीची

पुर्वहंगामी लागवडीच्या फळांवर तापमान वाढीमुळे जीवाणूजन्य ठिपक्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर, खरीप लागवडींवर बुरशीजन्य करपा, जीवणूजन्य व बुरशीजन्य मरमुळे लागवडी अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे फवारण्या वाढल्या आहेत. परिणामी पीक संरक्षण खर्च वाढून आर्थिक गणित बिघडले आहे. 

प्रमुख अडचणी  

  •  पावसामुळे मुळांची कार्यक्षमता कमी 
  •  करप्यामुळे पानांची गळ 
  •   पूर्वहंगामी फळांची पक्वता लवकर 
  •   कळी व फळांचे घड बाधित 
  •  डाग, चिऱ्यामुळे फळांच्या गुणवत्तेत घट
  •  मर रोगांमुळे लागवडीतील रोपांची मरतुक वाढली
  • मध्यंतरी जून व जुलै महिन्यात दरांत वाढ झाली. सध्या मागणी पुरवठा साखळी व्यवस्थित झाल्याने व जनजीवन सुरळीत झाले. मागणी वाढती असल्याने लागवडी वाढत्या आहेत. मात्र वातावरण रोगांना अनुकूल आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे.  - कैलास शिरसाठ, कृषी उपसंचालक, नाशिक .

    शेतकऱ्यांनी हवामान बदलानुसार अन्नद्रव्य, पीक संरक्षण यामध्ये आवश्यक ते बदल करून घ्यावे. तरच हंगामात उत्पादन व गुणवत्ता यांचा मेळ घालता येईल. प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेवर कराव्या. - प्रा. तुषार उगले, किटकशास्त्र विभाग, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक

    जिल्ह्याच्या पश्चिम भागात नागपंचमी पूर्व लागवडीवर करपा, रोपांची मरतुक, यासह गोगलगाय, नागअळी या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रणामावर अडचणी आहेत. तुलनेत नागपंचमीनंतरच्या लागवडींवर हा प्रादुर्भाव कमी आहे. - भास्कर कांबळे, टोमॅटो उत्पादक,जलालपूर,ता.जि.नाशिक

    तीन वर्षांतील लागवड (हेक्टर)

    जिल्हा २०१८  २०१९ २०२०
    नाशिक १११७८.८२ १११७८ १३८०५
    धुळे ०  ७२५ ३२५
    जळगाव १२४ २१
    नंदुरबार ४६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com