नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिर

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात टोमॅटो, शेवग्यासह भाजीपाल्याचे दर टिकून होते. लसूण, आल्याला मागणीही कायम होती.
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिर
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिर

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात टोमॅटो, शेवग्यासह भाजीपाल्याचे दर टिकून होते. लसूण, आल्याला मागणीही कायम होती. भुसार मालामध्ये काहीशी आवक वाढत आहे. बाजार समितीत भाजीपाल्याची आवक बऱ्यापैकी होती. मात्र, पावसामुळे भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात तेजीत होते. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अपेक्षित भाजीपाला बाजारात येण्याला अडचणीत होत होत्या. त्यामुळेही दरात तेजी असल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. येथील बाजारसमितीत टोमॅटोची दर दिवसाला ४० ते ५० क्विंटल आवक होती. टोमॅटोला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाला. वांग्याची २४ ते ३० क्विंटल आवक होती. वांग्याला १५०० ते २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची ३८ ते ४५ क्विंटल आवक होती. फ्लॉवरला २००० ते ४००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोबीची ४० ते ५० क्विंटल आवक होऊन १००० ते २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. काकडीची २५ ते ३० क्विंटल आवक होऊन १००० ते २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गवारीची आवक ८ ते १० क्विंटल आवक होती. त्यास ४००० ते ६००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. दोडक्याला १८ ते २५ क्विंटल आवक होऊन २००० ते ४००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कारल्याची २० ते २५ क्विंटल आवक होती. त्यास १५०० ते  ३५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीची २५ ते ३० क्विंटल आवक होती.  भेंडीला १००० ते २५०० रुपये क्विंटल दर होता. गेल्या काही दिवसांपासून लसणाची मागणीही कायम आहे. गेल्या आठवडाभरात दर दिवसाला लसणाची १२ ते १५ क्विंटल आवक होती. लसणाला ८००० ते  १२,०००  रुपये क्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३२ ते ३५ क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला २५०० ते ३५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. शेवग्याची ६ ते ८ क्विंटल आवक होऊन ४००० ते ६००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. आल्याची (अद्रक) १५ ते २५ क्विंटल आवक झाली. आल्यास ४००० ते ४५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गाजराची ५ ते ७ क्विंटल आवक झाली. गाजराला १००० ते २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. लिंबाची २० ते २२ क्विंटल आवक होत असून १००० ते २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.  मूग, उडिदाची आवक अधिक नगर कृषी उत्पन्न बाजार समिती मागील आठवड्यात भुसारची आवक काहीशी वाढली. त्यात मूग, उडदाची आवक अधिक आहे. मागील आठवड्यात ज्वारीला २००० ते ३२००, बाजरीला ११०० ते १७५०, तुरीला ५३०० ते ६०००, मुगाला ३६०० ते ७८००, उडिदाला ५५०० ते ६५०० तर सोयाबीनला ३१०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com