agriculture news in marathi tomato, drumstick rates stable in Nagar APMC | Agrowon

नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिर

सूर्यकांत नेटके 
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात टोमॅटो, शेवग्यासह भाजीपाल्याचे दर टिकून होते. लसूण, आल्याला मागणीही कायम होती. 

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात टोमॅटो, शेवग्यासह भाजीपाल्याचे दर टिकून होते. लसूण, आल्याला मागणीही कायम होती. भुसार मालामध्ये काहीशी आवक वाढत आहे. बाजार समितीत भाजीपाल्याची आवक बऱ्यापैकी होती. मात्र, पावसामुळे भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात तेजीत होते. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अपेक्षित भाजीपाला बाजारात येण्याला अडचणीत होत होत्या. त्यामुळेही दरात तेजी असल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले.

येथील बाजारसमितीत टोमॅटोची दर दिवसाला ४० ते ५० क्विंटल आवक होती. टोमॅटोला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाला. वांग्याची २४ ते ३० क्विंटल आवक होती. वांग्याला १५०० ते २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची ३८ ते ४५ क्विंटल आवक होती. फ्लॉवरला २००० ते ४००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोबीची ४० ते ५० क्विंटल आवक होऊन १००० ते २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. काकडीची २५ ते ३० क्विंटल आवक होऊन १००० ते २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

गवारीची आवक ८ ते १० क्विंटल आवक होती. त्यास ४००० ते ६००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. दोडक्याला १८ ते २५ क्विंटल आवक होऊन २००० ते ४००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कारल्याची २० ते २५ क्विंटल आवक होती. त्यास १५०० ते  ३५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीची २५ ते ३० क्विंटल आवक होती. 

भेंडीला १००० ते २५०० रुपये क्विंटल दर होता. गेल्या काही दिवसांपासून लसणाची मागणीही कायम आहे. गेल्या आठवडाभरात दर दिवसाला लसणाची १२ ते १५ क्विंटल आवक होती. लसणाला ८००० ते  १२,०००  रुपये क्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३२ ते ३५ क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला २५०० ते ३५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

शेवग्याची ६ ते ८ क्विंटल आवक होऊन ४००० ते ६००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. आल्याची (अद्रक) १५ ते २५ क्विंटल आवक झाली. आल्यास ४००० ते ४५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गाजराची ५ ते ७ क्विंटल आवक झाली. गाजराला १००० ते २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. लिंबाची २० ते २२ क्विंटल आवक होत असून १००० ते २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

मूग, उडिदाची आवक अधिक
नगर कृषी उत्पन्न बाजार समिती मागील आठवड्यात भुसारची आवक काहीशी वाढली. त्यात मूग, उडदाची आवक अधिक आहे. मागील आठवड्यात ज्वारीला २००० ते ३२००, बाजरीला ११०० ते १७५०, तुरीला ५३०० ते ६०००, मुगाला ३६०० ते ७८००, उडिदाला ५५०० ते ६५०० तर सोयाबीनला ३१०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. 


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...