नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणा

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार समितीत गेल्या आठवडाभरात टोमॅटो, घेवड्याच्या दरात सुधारणा कायम राहिली. भुसारमध्ये मुग, उडीद, सोयाबीन, गव्हाची आवक चांगली होती. भुसारची दर दिवसाला साडेतीन हजारापर्यंत आवक राहिली, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.
Tomato, Ghewda price improvement in Nagar
Tomato, Ghewda price improvement in Nagar

नाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार समितीत गेल्या आठवडाभरात टोमॅटो, घेवड्याच्या दरात सुधारणा कायम राहिली. भुसारमध्ये मुग, उडीद, सोयाबीन, गव्हाची आवक चांगली होती. भुसारची दर दिवसाला साडेतीन हजारापर्यंत आवक राहिली, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला १२५ ते १३० क्विंटलची आवक झाली. एक हजार ते तीन हजार रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला. घेवड्याची २ ते ३ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.  वांग्यांची ५० क्विटंलची आवक होऊन ५०० ते २ हजार रुपये, कोबीची ५० ते ६० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १९००, गवारची ६ ते १० क्विटंलची आवक होऊन ३ हजार ते ७ हजार, दोडक्याची १९ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, कारल्याची ३४ ते ४० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५००, भेंडीची ३९ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार ५००, बटाट्याची १७० ते २०० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १६००, हिरव्या मिरचीची ७० ते ९० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, गाजराची १७ ते २० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार व शिमला मिरचीची २३ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३१०० रुपयांचा दर मिळाला. 

मेथीच्या ६ हजार ४०० जुड्यांची दर दिवसाला आवक होऊन शंभर जुड्यांना ३०० ते ५०० रुपये, कोथिंबिरीच्या ६ हजार ५०० जुड्यांपर्यंतची दर दिवसाला आवक होऊन ३०० ते ५००, पालकच्या २०० जुड्यांची आवक होऊन ५०० ते ६००, शेपुच्या १ हजार  ते ११०० जुड्यांची आवक होऊन ३०० ते ६०० रुपयांचा दर मिळाला. हरभरा जुड्यांचीही बाजारात आवक सुरु झाली आहे. दर दिवसाला साधारण २०० ते २५० जुड्यांची आवक होत आहे. 

  भुसारची आवक वाढली

नगर बाजार समितीतीत भुसारची आवक मागील आठवड्यात वाढली. ज्वारीची ३०० क्विटंलपर्यत आवक होऊन १३५० ते १८९५ रुपयांचा दर मिळाला. बाजरीला १३५० ते १९५० रुपये, तुरीला ४५०० ते ६ हजार,  जवसाला ५९००, हरभऱ्याला ४०२५ ते ४५५०, मुगाला ५३०० ते ७२५१, सोयाबीनला ५ हजार ते ६ हजार, गव्हाला १८२१ ते २१०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com