agriculture news in Marathi tomato plants demand decreased to Rumors of a virus Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कथित अफवेचा टोमॅटो रोपांच्या मागणीवर परिणाम

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

माझ्या रोपवाटिकेतून मे महिन्याच्या सुमारास सुमारे पंधरा ते वीस लाख टोमॅटो रोपांची विक्री होते. परंतू व्हायरस बाबत पसरलेल्या अफवेमुळे शेतकऱ्यांनीही नव्या लागवडी थांबविल्या आहेत. नोंदणी केलेली रोपांची मागणी ही रद्द केली जात आहे. 
- शिवाजीराव कचरे, रोपवाटिका चालक, तमदलगे जि.कोल्हापूर

कोल्हापूर: कोरोनापेक्षा घातक व्हायरस टोमॅटोवर आल्याच्या पसरलेल्या कथित अफवेचा विपरीत परिणाम टोमॅटो रोपांच्या मागणीवर झाला आहे. बाजारपेठांमध्ये टोमॅटोची मागणी व दर घसरल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटो रोपांची लागवडच रद्द केली आहे. अनेक रोपवाटिकांमध्ये टोमॅटोची रोपे तयार असूनसुद्धा मागणीअभावी पडून राहिल्याने रोपवाटिका चालक हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या रोपवाटिकांमधून केवळ पंचवीस टक्के रोपांची विक्री झाली आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी मे महिन्यात विविध रोपवाटिकांमधून स्थानिक लागवडीसाठी सुमारे एक कोटींहून अधिक रोपांची विक्री होत असते. यंदा मे महिन्याचा उत्तरार्ध सुरु झाला तरी विक्रीने गती घेतली नाही. गेल्या आठ, दहा दिवसांत तर पूर्व नोंदणी केलेले शेतकरीच व्हायरसच्या अफवेचा उल्लेख करीत रोपांची मागणी रद्द करत आहेत. यामुळे यंदा टोमॅटोच्या लागवडीतही मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून टोमॅटो उत्पादकांची स्थिती बिकट बनली आहे. टोमॅटोवर रोग आल्याने अगोदरच उत्पादकाला टोमॅटोचे व्यवस्थापन करणे अशक्‍य बनत होते. यातच माध्यमामध्ये उलट सुलट बातम्या आल्याने याचा मोठा परिणाम मोठ्या बाजारपेठांवर झाला. सर्वच बाजारपेठांमधून एक तर टोमॅटोची विक्री घटली तर दुसरीकडे दरातही मोठी घसरण झाली. याचा फटका नव्याने टोमॅटो लागवड करणाऱ्या उत्पाकांच्या मनौधैर्यालाही बसला 

पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भाजीपाला उत्पादक संघांनी धोका पत्करुन टोमॅटो अहमदाबादच्या बाजारपेठेत पाठविले. पण तिथेही टोमॅटो उतरुन घेण्यासाठीही अडचणी आल्या. उत्पादन खर्चही निघाला नाही. स्थानिक बाजारपेठेत तर दर नाहीच पण परराज्यातही मागणी नसल्याने उत्पादक अडचणीत आले. परिणामी त्यांनी मे महिन्यातील टोमॅटो लागवड रद्द केली आहे. 

रोपवाटिका चालकांची गोची 
लॉकडाउनमुळे बियाणे, कोकोपीट, ट्रे उपलब्धता होत नव्हती. परंतू तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये सुट मिळाल्याने रोपवाटिका चालकांनी गडबडीने कच्चा माल उपलब्ध करुन मागणी इतकी रोपे तयार करण्यास प्राधान्य दिले. उपलब्ध मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर करुन शेतकऱ्यांना वेळेत रोपे पाठविण्याची तयारी केली. पण अचानक व्हायरसच्या अफवेचा विपरीत परिणाम झाल्याने सगळेच समीकरण बिघडले. या रोपांचे काय करायचे? या चिंतेत रोपवाटिका चालक आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...
बुलडाण्यात सोयाबीनबाबत २७०० पेक्षा अधिक...बुलडाणा ः निकृष्ट बियाणे तसेच इतर कारणांमुळे...
विदर्भात खत कमतरतेमुळे जादा दराने विक्रीनागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यात सध्या युरियाची...
रत्नागिरी जिल्ह्यात पुरेसा खत पुरवठारत्नागिरी : खरीप हंगामाच्या सुरुवातीला वेळेत खत न...
सांगलीत खतांची कमतरतासांगली ः जिल्ह्यात ८० टक्के खतांचा पुरवठा केला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान...
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...