टोमॅटोचे दर उतरले; शेतकरी संतप्त

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील टोमॅटो उपबाजारात शुक्रवारी (ता. १८) सुमारे पन्नास हजार टोमॅटो क्रेटची उंचाकी आवक झाली. मागणीपेक्षा आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी हलक्या प्रतीच्या टोमॅटोची खरेदी थांबवली.
टोमॅटोचे दर उतरले; शेतकरी संतप्त Tomato prices fell; Farmers angry
टोमॅटोचे दर उतरले; शेतकरी संतप्त Tomato prices fell; Farmers angry

नारायणगाव, जि. पुणे :  जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील टोमॅटो उपबाजारात शुक्रवारी (ता. १८) सुमारे पन्नास हजार टोमॅटो क्रेटची उंचाकी आवक झाली. मागणीपेक्षा आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी हलक्या प्रतीच्या टोमॅटोची खरेदी थांबवली. त्यामुळे संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी उपबाजार आवारातच ठिय्या आंदोलन केले. ‘टोमॅटो घेता का कुणी टोमॅटो’ अशी म्हणण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली. दरम्यान सभापती संजय काळे यांनी व्यापारी व शेतकरी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केल्याने टोमॅटो क्रेट खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी नाशिक, संगमनेर येथील टोमॅटो बाजार बंद असल्याने शुक्रवारी येथील उपबाजारात रोजच्या तुलनेत दुप्पट आवक झाली. कोरोनामुळे टोमॅटोला मागणी नसल्याने बाजार समितीने वारंवार संपर्क साधून देखील इतर राज्यातील व्यापारी अद्याप टोमॅटो खरेदीसाठी उपबाजारात दाखल झाले नाहीत. मागील वर्षी सुद्धा हीच स्थिती होती.  सध्या मुंबई येथील व्यापाऱ्यांची २० ते २५ हजार क्रेटची मागणी असताना शुक्रवारी उपबजारात सुमारे पन्नास हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. शनिवारी ( ता.१९) पंचेचाळीस हजार टोमॅटो क्रेटची उंचाकी आवक झाली. टोमॅटोचे लिलाव सुरळीत सुरू झाले. प्रतवारी नुसार टोमॅटो क्रेटला ५० रुपये ते १५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. मात्र या बाजारभावात शेतकरी समाधानी नाहीत. भांडवली खर्च वसूल होण्यासाठी टोमॅटो क्रेटला( वीस किलोग्रॅम) किमान २५० रुपये भाव मिळणे अपेक्षित असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया कोरोनाची पार्श्वभूमी असताना शेतकरी हिताचा विचार करून जुन्नर बाजार समितीने मागील वर्षभर भाजीपाला खरेदी विक्री सुरू ठेवली आहे. देशाच्या बहुतेक भागात हॉटेल, भाजीपाला मंडी बंद आहे. मागणी नसल्याने व इतर राज्यातील टोमॅटो हंगाम सुरू झाल्याने टोमॅटो भावात घट झाली आहे. व्यापारी टोमॅटो खरेदी करण्यास तयार नाहीत. या प्रतिकूल परिस्थितीत टोमॅटो वितरण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. काही लोक राजकारण करून शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. - संजय काळे, सभापती, जुन्नर बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com