Agriculture news in marathi Tomato prices fell; Farmers angry | Page 2 ||| Agrowon

टोमॅटोचे दर उतरले; शेतकरी संतप्त

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील टोमॅटो उपबाजारात शुक्रवारी (ता. १८) सुमारे पन्नास हजार टोमॅटो क्रेटची उंचाकी आवक झाली. मागणीपेक्षा आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी हलक्या प्रतीच्या टोमॅटोची खरेदी थांबवली.

नारायणगाव, जि. पुणे :  जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील टोमॅटो उपबाजारात शुक्रवारी (ता. १८) सुमारे पन्नास हजार टोमॅटो क्रेटची उंचाकी आवक झाली. मागणीपेक्षा आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी हलक्या प्रतीच्या टोमॅटोची खरेदी थांबवली. त्यामुळे संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी उपबाजार आवारातच ठिय्या आंदोलन केले. ‘टोमॅटो घेता का कुणी टोमॅटो’ अशी म्हणण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली.

दरम्यान सभापती संजय काळे यांनी व्यापारी व शेतकरी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केल्याने टोमॅटो क्रेट खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले.
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी नाशिक, संगमनेर येथील टोमॅटो बाजार बंद असल्याने शुक्रवारी येथील उपबाजारात रोजच्या तुलनेत दुप्पट आवक झाली. कोरोनामुळे टोमॅटोला मागणी नसल्याने बाजार समितीने वारंवार संपर्क साधून देखील इतर राज्यातील व्यापारी अद्याप टोमॅटो खरेदीसाठी उपबाजारात दाखल झाले नाहीत. मागील वर्षी सुद्धा हीच स्थिती होती. 

सध्या मुंबई येथील व्यापाऱ्यांची २० ते २५ हजार क्रेटची मागणी असताना शुक्रवारी उपबजारात सुमारे पन्नास हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. शनिवारी ( ता.१९) पंचेचाळीस हजार टोमॅटो क्रेटची उंचाकी आवक झाली. टोमॅटोचे लिलाव सुरळीत सुरू झाले. प्रतवारी नुसार टोमॅटो क्रेटला ५० रुपये ते १५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. मात्र या बाजारभावात शेतकरी समाधानी नाहीत. भांडवली खर्च वसूल होण्यासाठी टोमॅटो क्रेटला( वीस किलोग्रॅम) किमान २५० रुपये भाव मिळणे अपेक्षित असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया
कोरोनाची पार्श्वभूमी असताना शेतकरी हिताचा विचार करून जुन्नर बाजार समितीने मागील वर्षभर भाजीपाला खरेदी विक्री सुरू ठेवली आहे. देशाच्या बहुतेक भागात हॉटेल, भाजीपाला मंडी बंद आहे. मागणी नसल्याने व इतर राज्यातील टोमॅटो हंगाम सुरू झाल्याने टोमॅटो भावात घट झाली आहे. व्यापारी टोमॅटो खरेदी करण्यास तयार नाहीत. या प्रतिकूल परिस्थितीत टोमॅटो वितरण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. काही लोक राजकारण करून शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- संजय काळे, सभापती, जुन्नर बाजार समिती


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...