agriculture news in Marathi, Tomato prices rise in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात टोमॅटोच्या दरात वाढ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 जून 2019

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोचे दर तेजीत होते. टोमॅटोस दहा किलोस ७० ते ३२० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. टोमॅटोची दीड ते दोन हजार क्रेट आवक झाली. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोची आवक काहीशी मंदावल्याने टोमॅटोचे दर वाढल्याची माहिती भाजीपाला विभागाच्या सूत्रांनी दिली. 

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोचे दर तेजीत होते. टोमॅटोस दहा किलोस ७० ते ३२० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. टोमॅटोची दीड ते दोन हजार क्रेट आवक झाली. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोची आवक काहीशी मंदावल्याने टोमॅटोचे दर वाढल्याची माहिती भाजीपाला विभागाच्या सूत्रांनी दिली. 

वांग्याची चारशे ते पाचशे पोती आवक झाली. वांग्यास दहा किलोस ६० ते २५० रुपये दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान वाढत आहे. उष्णता कायम असल्याने वांग्यावर रोग किडीचा प्रादुर्भाव अधिक होत आहे. परिणामी वांग्याचे व्यवस्थापन करणे अडचणीचे ठरत असल्याचे वांगी उत्पादकांनी सांगितले. 

शिरोळ तालुक्‍याबरोबर मिरज, वाळवा तालुक्‍यातूनही वांग्याची आवक होत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. ओल्या मिरचीची तीनशे ते चारशे पोती आवक होती. ओली मिरचीस दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. गवारीची पंचवीस ते पन्नास पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस १८० ते २७० रुपये दर होता. भेंडीस दहा किलोस ५० ते २५० रुपये दर मिळाला. गाजराची तीस ते पन्नास पोती आवक झाली. गाजरास दहा किलोस २७० ते ३०० रुपये दर होता. 

पालेभाज्यांची कोथिंबीरीची पंधरा ते वीस हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते १४०० रुपये दर होता. मेथीस शेकडा १४०० ते १८०० रुपये दर मिळाला. हापूस आंब्याची तीन ते पाच हजार पेट्या आवक झाली. हापूसला दोन डझनाच्या बॉक्‍सला ५० ते २२५ रुपये दर होता.

इतर बाजारभाव बातम्या
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...
सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...
राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...
कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात मूग सरासरी ५६०० रुपये क्विंटलअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात मिरची, गवार, भेंडीचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...