Agriculture news in Marathi, Tomato per quintal at Ratnagiri 3000 to 3500 rupees | Agrowon

रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 जून 2019

रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोल्हापूर, बेळगाव येथून आलेल्या विविध प्रकारच्या पालेभाज्या येत आहेत. त्यामध्ये टॉमेटो, फ्लॉवर आणि वांग्याचे दर वधारले आहेत. टॉमेटोला अगोदर क्विंटलला १००० ते २००० रुपये दर होते. मात्र, आता दरात सुधारणा झाली असून, ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. भाजीची आवक घटल्यामुळे दर वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोल्हापूर, बेळगाव येथून आलेल्या विविध प्रकारच्या पालेभाज्या येत आहेत. त्यामध्ये टॉमेटो, फ्लॉवर आणि वांग्याचे दर वधारले आहेत. टॉमेटोला अगोदर क्विंटलला १००० ते २००० रुपये दर होते. मात्र, आता दरात सुधारणा झाली असून, ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. भाजीची आवक घटल्यामुळे दर वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात भाजीपाला लागवड होत नाही. त्यामुळे रत्नागिरीतील व्यावसायिकांना शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागते. नियमित भाजीपाल्यासाठी रत्नागिरीतील मोठे व्यापारी बहुतांशी बेळगाव येथून भाजी घेऊन येतात. त्यापाठोपाठ भाजीपाल्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागते. 

शहर परिसरातील काही शेतकरी भाजी पाल्याची 
लागवड करतात. मात्र, ते किरकोळ विक्रीवर भर देतात. सद्यःस्थितीत बाजार समितीत २००० नग आवक झालेल्या कोथिंबिरीला १० ते १८ रुपये जुडीला दर मिळाला आहे. कोबीची ४८ क्विंटल आवक झाली असून, कमीत कमी १००० रुपये तर जास्तीत जास्त १५०० रुपये आहे. टॉमेटो तीनशे क्विंटल आणला गेला. त्याचा दर प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये आकरण्यात आला. 

गवारचा दर ३००० ते ४००० रुपये, ४० क्विंटल ढोबळी मिरचीची आवक आहे. तिचा दर क्विंटलला ३००० ते ४००० रुपये आहे. फ्लॉवरची आवक ९१ क्विंटल असून, दर २५०० ते ३५००, भेंडीची आवक ५० क्विंटल असून, दर २००० ते ३००० रुपये, वांग्याची आवक ६० क्विंटल असून, दर १५०० ते २००० रुपये आहे. 

हिरवी मिरचीची ६५ क्विंटल आवक झाली असून त्या मिरचीला ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मेथीची भाजी ६०० नग आवक असून, १० रुपये ते १५ रुपये जुडी दर आहे. कारल्याची आवक १३ क्विंटल असून, ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.

इतर ताज्या घडामोडी
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...