राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५०० रुपये

राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५०० रुपये
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५०० रुपये

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ३) टोमॅटोची आवक ८२५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान १००० ते कमाल २२५० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २) टोमॅटोची आवक ८७५ क्विंटल झाली. त्यास ७५० ते २२५० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० रुपये होते. सोमवारी (ता. १) टोमॅटोची आवक ७२० क्विंटल झाली. त्यास ६२५ ते १७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १६६०होते. रविवारी (ता. ३०) टोमॅटोची आवक ८६५ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होते. शनिवारी (ता. २९) टोमॅटोची आवक ९३५ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १७७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होते. शुक्रवारी (ता. २८) टोमॅटोची आवक ११७५ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६२५ होते. गुरुवारी (ता. २७) टोमॅटोची आवक ११२५ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होते. टोमॅटोची आवक कमी झाल्याचे दिसून येते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत टोमॅटोची आवक कमी जास्त होत आहे . आवकेप्रमाणे बाजारभाव निघत आहेत.

पुण्यात प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ४) टोमॅटोची सुमारे चार हजार क्रेटची आवक झाली होती. या वेळी दहा किलोला ८० ते १४० रुपये दर होता. पावसामुळे आवक ही सरासरी असून मागणीदेखील कमी असल्याचे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले. आवक ही प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्‍ह्यांमधून होत आहे.

सांगलीत प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये सांगली ः येथील शिवाजी मंडईत टोमॅटोची आवक कमी-अधिक आहे. गुरुवारी (ता. ४) टोमॅटोची ३०० क्रेट (एक क्रेट १५ किलोचे) आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १०० ते २०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.शिवाजी मंडईत टोमॅटोची आवक खानापूर, मिरज, वाळवा, आष्टा, तुंग, दुधगाव तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून होते. बुधवारी (ता. ३) टोमॅटोची २०० क्रेटची आवक झाली होती. टोमॅटोस प्रति दहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. २) टोमॅटोची १५० क्रेटची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. १) टोमॅटोची २०० क्रेटची आवक झाली होती. टोमॅटोस प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला. रविवारी (ता. ३०) टोमॅटोची २०० क्रेटची आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला. शेतकरी नवीन टोमॅटोची लागवड करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात टोमॅटोच्या दरात प्रतिकिलोस पाच रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारीवर्गाने दिली.

परभणीत प्रतिक्विंटल १३०० ते २००० रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ४) टोमॅटोची १५०० क्रेट आवक होती. टोमॅटोच्या प्रतिक्रेटला २५० ते ४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, नगर जिल्हा तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी टोमॅटोची सरासरी १००० ते १५०० क्रेट आवक झाली. त्या वेळी प्रतिक्रेट २५० ते ५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ४) टोमॅटोची १५०० हजार आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्रेट २५० ते ४०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी सय्यद मुसा यांनी सांगितले.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ४०० ते १८०० रुपये कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दीड ते दोन हजार क्रेट इतकी आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस ४० ते १८० रुपये दर मिळाला. गेल्या पंधरवड्यापासून टोमॅटोच्या आवकेत काही प्रमाणात वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. टोमॅटोचे दर स्थिर आहेत. बाजार समितीत टोमॅटो बेळगाव भागातून जास्त करून येत आहे. पंधरवड्यापूर्वी टोमॅटोची आवक काहीशी रोडावली होती. आता नव्या हंगामातील टोमॅटो बाजार समितीत येत आहेत. यामुळे नजीकच्या काळात टोमॅटोच्या आवकेत वाढहोण्याची शक्‍यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली. सांगली जिल्ह्यातील विटा, कवठेमहाकांळ भागातूनही काही प्रमाणात टोमॅटोची  आवक सुरू असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १००० ते २००० रुपये औरंगाबाद : येथील कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ४) टोमॅटोची १७९ क्‍विंटल आवक झाली. या टोमॅटोला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये गतपंधरवड्यात टोमॅटोची आवक व दरात चढउतार पहायला मिळाला. १६ जूनला २३५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १९ जूनला २१० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचा दर १००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा राहिला. २५ जूनला टोमॅटोची आवक १८१ क्‍विंटल तर दर ७०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६ जूनला १३८ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २७ जूनला १८१ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ४०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २ जुलैला ४५४ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ जुलैला १७५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोलापुरात प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोला चांगला उठाव राहिला. त्याची आवकही वाढली, पण मागणी असल्याने दर तेजीत राहिले. टोमॅटोला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्राकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात टोमॅटोची आवक रोज १०० ते ३०० क्विंटल पर्यंत झाली. टोमॕटोची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात हाच दर प्रतिक्विंटल किमान ३०० रुपये, सरासरी १००० आणि सर्वाधिक ३००० रुपयांवर होता. तर आवक रोज ८० ते १०० क्विंटलपर्यंत होती. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आवक एकदमच कमी ५० ते ७० क्विंटलपर्यंत झाली आणि दर प्रतिक्विंटल किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये इतका मिळाला. पण सध्या आवक वाढते आहे. पण मागणीही वरचेवर वाढतच आहे. त्यामुळे दर आणखी वधारण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये अकोला ः येथील जनता भाजी बाजारात टोमॅटोची गुरुवारी (ता. चार) प्रतिक्रेट ४०० ते ६०० रुपयांदरम्यान विक्री झाली. एक क्रेट २० ते २२ किलो वजनाचे असते. या बाजारात टोमॅटोची दररोज एक हजार क्रेटपेक्षा अधिक आवक होत आहे. अकोला बाजारपेठेत येणारा संपूर्ण टोमॅटो हा नारायणगाव, संगमनेर या भागांतून येत आहे. दिवसाला हजार क्रेटची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. टोमॅटोच्या दरात गेल्या काही दिवसांपासून स्थिरता आहे. दुय्यम दर्जाचा टोमॅटो सरासरी २००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल विकत आहे. तर चांगल्या दर्जाचा टोमॅटो ६०० रुपये क्रेट म्हणजेच तीन हजार रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री दररोज ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com