नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अंतिम टप्प्यात

ओखी वादळाच्या तडाख्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. यामुळे बाजारात दुय्यम दर्जाच्या टोमॅटोची आवक झाल्यामुळे गुरुवारी (ता.७) टोमॅटोच्या दरात उतरण झाली होती. मात्र शनिवार (ता.९) पासून पुन्हा दरात वाढ झाली. आवकेचे चित्र पाहता टोमॅटोचे हे दर येत्या काळात टिकून राहतील अशी स्थिती आहे. - सुभाष पूरक, टोमॅटो उत्पादक, वडनेरभैरव, ता. चांदवड, जि. नाशिक
टोमॅटो
टोमॅटो

नाशिक : दसऱ्यापासून सुरू झालेला नाशिक भागातील खरीप टोमॅटोचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत, लासलगाव यासह गिरणारे, खोरीफाटा या बाजारातील टोमॅटोची आवक ८० टक्‍क्‍यांनी घटली आहे. गत सप्ताहात टोमॅटोला प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला १०१ ते ७३१ व सरासरी २५० रुपये दर मिळाले.  दसरा, दिवाळीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात दररोज ४ लाख क्रेटची आवक होत होती. ही आवक गत सप्ताहात अवघी ४० हजारांवर आली आहे. या स्थितीत गत सप्ताहात टोमॅटोच्या दरात मोठीच चढ उतार झाल्याचे दिसून आले. गत सप्ताहाच्या सुरवातीस सोमवारी (ता.४)  पिंपळगाव बसवंत बाजार समितीत १७३० क्रेटची आवक झाली. या वेळी टोमॅटोला प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला १०१ ते ७३१ व सरासरी ५५१ असा दर मिळाला. नाशिक भागातील टोमॅटो हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना गत सप्ताहात खुडत्या अवस्थेतील टोमॅटो पिकाला जोरदार पावसाने झोडपले. परिणामी टोमॅटोच्या दरात ५० टक्‍क्‍यांनी उतरण झाली. प्रति क्रेटचे दर सरासरी ५५० वरून २०० पर्यंत उतरले होते. गुरुवारी (ता.७) व शुक्रवारी (ता.८) दर उतरलेले असताना शनिवारी मात्र पुन्हा दराने उसळी घेत ३०० चा दर गाठला. रविवारी (ता.१०) खोरी फाटा, गिरणारे या बाजारात टोमॅटोला १०० ते ४५० व सरासरी २७५ रुपये दर मिळाले. यंदा सुरवातीपासून टोमॅटोला स्थिर दर मिळाल्यामुळे टोमॅटो पिकाची विशेष काळजी घेण्यावर उत्पादकांनी भर दिला आहे. बहुतांश भागात दुसऱ्यांदा बहर घेण्याचे प्रयोग सुरू आहेत. चांदवड तालुक्‍यात उशिरा लागवड झालेल्या टोमॅटोची आवक येत्या सप्ताहात सुरू होईल.  दरम्यान सध्याचे दर येत्या काळात स्थिर राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील गत सप्ताहातील टोमॅटोचे दर (आवक व दर प्रति क्विंटलचे)

दिवस (तारीख)  आवक      किमान    कमाल    सरासरी
सोमवार (ता.४)  ८६५४     ५०५     ३६५५     २७५५
मंगळवार (ता. ५) ३८०५     ५००     ३५००     २३५५
बुधवार (ता.६)   ७७६२     ५०५     ३५५५     २४०५
गुरुवार (ता.७)   ६४५५     ३५५     २०५५     ९०५
शुक्रवार (ता.८)   ६८४०     २५५     १५००     ६५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com