राज्यात टोमॅटो ३०० ते १८०० रुपये क्विंटल

Tomatoes are 300 to 1800 rupees per quintal
Tomatoes are 300 to 1800 rupees per quintal

पुण्यात प्रति दहा किलोस १०० ते १२० रुपये

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) टोमॅटोची सुमारे ६ हजार क्रेटस आवक झाली होती. या वेळी दहा किलोला १०० ते १२० रुपये दर मिळाला. 

बाजार समितीमध्ये होणारी आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. सध्या थंडीमुळे आवक कमी होत चालली आहे. जससशी थंडी वाढू लागेल, त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे. दर १० ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी व्यक्त केली. 

गेल्या चार दिवसांतील आवक (क्विंटल)  

दिनांक आवक दर 
 १८९० ५००-१००० 
३१  १४५८ ५००-१०००
३० २१२६ ६००-१००

परभणीत प्रतिक्रेटला १२० ते २०० रुपये

परभणी ‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २) टोमॅटोची ९०० क्रेट आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्रेट १२० ते २०० रुपये (प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये) दर मिळाले’’, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच औरंगाबाद, लातूर, हिंगोली आदी जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी टोमॅटोची ७०० ते ९०० क्रेट आवक झाली. त्या वेळी प्रतिक्रेटला सरासरी १२० ते २५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २) टोमॅटोची ९०० क्रेट आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्रेट १२० ते २०० रुपये राहिले. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

औरंगाबादेत  ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) टोमॅटोची १६३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २३ डिसेंबरला टोमॅटोची ११७ क्‍विंटल आवक झाली होती. त्यांना ३५० ते ६५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ डिसेंबरला १२७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २८ डिसेंबरला ११८ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ४०० ते ६५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० डिसेंबरला १३१ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३१ डिसेंबरला १०६ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ७०० ते १३०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ८०० रुपये

 सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची आवक वाढली, पण टोमॅटोचे दरही काहीसे स्थिर राहिले, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची आवक रोज १०० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून टोमॅटोच्या आवक आणि दराची परिस्थिती काहीशी अशीच आहे. टोमॅटोची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक ८०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही टोमॅटोची आवक १०० ते १५० क्विंटलपर्यंत होती. प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.  

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही टोमॅटोची आवक काहीशी कमी प्रतिदिन ५० ते १०० क्विंटलपर्यंत होती. पण, दर मात्र स्थिरच राहिले. या सप्ताहात टोमॅटोला किमान २०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक ८५० रुपये असा दर मिळाला. आता पुन्हा किरकोळ चढ-उतार वगळता आवक आणि दर ‘जैसे थे’ आहेत. येत्या काळातही टोमॅटोच्या आवकेवरच दराचे गणित अवलंबून असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १) टोमॅटोंची आवक ७१६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर ११०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. ३१) टोमॅटोची आवक ८०६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १४०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ८७५ रुपये होता. सोमवार (ता. ३०) टोमॅटोची आवक ९८० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० मिळाला. रविवार (दि. २९) रोजी टोमॅटोची आवक १२०० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १४०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

सर्वसाधारण सर ११०० मिळाला. शनिवार (ता. २८) रोजी टोमॅटोची आवक ८२० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण सर ११२५ मिळाला. शुक्रवारी (ता. २७) टोमॅटोची आवक १०५० क्विंटल झाली. त्यास ४५० ते १३०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० होते. गुरुवार (ता. २६ ) टोमॅटोची आवक १०९६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८७५ होते. गेल्या तीन दिवसांपासून आवक कमी झाली असून दरात किंचित सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सांगलीत दहा किलोस ५० ते १५० रुपये

सांगली येथील शिवाजी मंडईत टोमॅटोच्या आवकीत वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २) टोमॅटोची ७०० ते ८०० क्रेट (एक क्रेट २० किलोचे) आवक झाली. त्यांना प्रति दहा किलोस ५० ते १५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंडईत जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज, विटा तालुक्यांसह शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून टोमॅटोची आवक होते. बुधवारी (ता. १) टोमॅटोची ७०० ते ८०० क्रेट आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ५० ते १५० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. ३१) टोमॅटोची ८०० ते ९०० क्रेट आवक झाली. त्या वेळी ६० ते १८० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. ३०) टोमॅटोची ६०० ते ७०० क्रेट आवक झाली. दर ६० ते १५० रुपये असा मिळाला.

मंगळवारी (ता. २९) टोमॅटोची ६०० ते ७०० क्रेट आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ६० ते १५० रुपये असा दर मिळाला. पुढील सप्ताहात टोमॅटोची आवक आणि दर स्थिर राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

जळगावात १००० ते १८०० रुपये दर

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) टोमॅटोची १९ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाले. आवक जामनेर, एरंडोल, धुळे, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, जालना या भागांतून होत आहे. दर मागील पंधरवड्यापासून टिकून असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

नगरमध्ये ५०० ते १३०० रुपये 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २) टोमॅटोची ६० क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १३०० व सरासरी ९०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून सातत्याने आवक व दर स्थिर आहेत. या महिन्यात टोमॅटोची आवक वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण ४० ते ८० क्विटंल टोमॅटोची आवक होत असते. २६ डिसेंबरला ५२ क्विंटलची आवक होऊन ४०० ते १००० व  सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. ५०० ते १२०० व सरासरी ८५० रुपयांचा दर मिळाला. 

१२ डिसेंबर रोजी ३४ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२०० व सरासरी ८५० रुपयांचा दर मिळाला. ३ डिसेंबर रोजी ४७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२०० व सरासरी ८५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

अकोल्यात १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर

अकोला येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. २) टोमॅटो १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. बाजारात सुमारे ८०० क्रेटपर्यंत टोमॅटोची आवक झाली. 

सध्या ढगाळ वातावरण असल्याने टोमॅटो पिकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आवक सरासरी ८०० क्रेटपेक्षा अधिक आहे. हा संपूर्ण माल जिल्ह्यातील विविध भागातून विक्रीला येत आहे. एका क्रेटमध्ये १८ ते २० किलो टोमॅटो असतो. क्रेटला २०० ते ३०० दरम्यान दर मिळाला.

 गुरुवारी उत्कृष्ट दर्जाचा टोमॅटो १२०० ते १५०० रुपये क्विंटल दराने विक्री झाला. तर दुय्यम दर्जाच्या टोमॅटोला ९०० ते १२०० पर्यंत दर होता. आवक वाढलेली असल्याने तसेच मागणी कमी झाल्याने दर सध्या उतरल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. टोमॅटोची किरकोळ विक्री २० ते ३० रुपयांदरम्यान प्रतिकिलोने होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com