औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटल

औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ४) टोमॅटोची ६३, तर फ्लॉवरची २१ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला सरासरी १६००, तर फ्लॉवरला ३२५० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाला.
 Tomatoes in Aurangabad Rs.1600 per quintal
Tomatoes in Aurangabad Rs.1600 per quintal

औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ४) टोमॅटोची ६३, तर फ्लॉवरची २१ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला सरासरी १६००, तर फ्लॉवरला ३२५० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाला. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये सोमवारी हिरव्या मिरचीची ५२ क्विंटल आवक झाली. तिला सरासरी ३५५० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक १० क्विंटल, तर सरासरी दर ३२५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. गवारीची आवक ४ क्विंटल, तर सरासरी दर ५५०० रुपये राहिला. काकडीची आवक २६ क्विंटल, तर सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. भेंडीला सरासरी ४७५० रुपये दर मिळाला. कोबीची आवक १४ क्विंटल, तर दर सरासरी २७५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १५ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

मेथीची आवक ७६०० जुड्यांची झाली. तिला सरासरी ७०० रुपये प्रतिशेकडाचा दर मिळाला. आवक ६४०० जुड्या, तर सरासरी दर ७०० रुपये प्रतिशेकडा राहिला. ८९०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला सरासरी ५५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. शेवग्याची आवक १२ क्विंटल झाली. ६५०० रुपये सरासरी दर मिळाला. २० क्विंटल आवक झालेल्या पपईचे सरासरी दर ४५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. दुधी भोपळ्याची आवक २४ क्विंटल, तर सरासरी दर ५५० रुपये राहिले. ढोबळ्या मिरचीची आवक ९ क्विंटल झाली. तिला ३७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ८७ क्विंटल आवक झालेल्या गाजराला सरासरी ११०० रुपये दर मिळाला. ६ क्विंटल आवक झालेल्या कारल्याला ३२०० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

मक्याची आवक १३ क्विंटल, तर सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २४ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला २८५० रुपये सरासरी दर मिळाला. डाळिंबांची आवक १४ क्विंटल, तर सरासरी दर ३२५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या चिकूचे सरासरी  दर २००० रुपये राहिले.  साध्या बोरांची आवक १३ क्विंटल, तर सरासरी दर १२५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. पेरूची आवक ११ क्विंटल झाली. त्यांना सरासरी १०५० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला.

आठ क्विंटल आवक झालेल्या अंजिराला सरासरी ५७५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. बटाट्याची आवक ५१३ क्विंटल, तर सरासरी दर ११५० रुपये राहिला. सहा क्विंटल आवक झालेल्या द्राक्षाचे सरासरी दर ४५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com