संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
ताज्या घडामोडी
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर स्थिर
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. १०) टोमॅटो, वांगी, बटाट्याला मागणी राहिली. त्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. पण, उठाव चांगला असल्याने दरातील तेजी टिकून असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीतीच्या आवारात मंगळवारी वांग्याची ३० ते ५० क्विंटल, टोमॅटोची २०० क्विंटल आणि बटाट्याची दीड टनापर्यंत आवक राहिली. वांगी आणि टोमॅटोची आवक स्थानिक भागातूनच झाली. बटाट्याची आवक मात्र बाहेरील जिल्ह्यातून झाली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आवकेत चढ-उतार होत असला, तरी मागणी टिकून असल्याने दरही स्थिर आहेत.

वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, टोमॅटोला किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये, तर बटाट्याला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय गवार, घेवडा, ढोबळी मिरचीचे दरही काहीसे तेजीतच राहिले. त्यांची आवक मात्र अगदीच जेमतेम राहिली. रोज १० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली.
गवारला प्रतिक्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये, घेवड्याला किमान १४०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, तर ढोबळी मिरचीला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला.
भाजीपाल्याचे दरही स्थिर राहिले. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. मेथी आणि शेपूला शंभर पेंढ्यांना प्रत्येकी ३०० ते ५०० रुपये दर मिळाला.
गाजर, काकडीला उठाव
याशिवाय गाजर आणि काकडीलाही मंगळवारी चांगली मागणी राहिली. पण, मागणीच्या प्रमाणात त्यांची आवक नव्हती. गाजराची १५ क्विंटल आणि काकडीची ७ क्विंटलपर्यंत आवक राहिली. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागणी आणि आवकेत चढ-उतार कायम आहे. पण दर टिकून आहेत. विशेषतः काकडीचे दर सर्वाधिक तेजीत आहेत. गाजराला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि १६०० रुपये आणि काकडीला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला.
- 1 of 1029
- ››