Agriculture news in marathi Tomatoes can not be harvested | Agrowon

तोडणीला परवडेना टोमॅटो 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 एप्रिल 2021

जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील उन्हाळी टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पडलेल्या दरामुळे तोडणीलाही टोमॅटो परवडत नसल्याचे चित्र आहे. शेतात ठेऊन तरी करावं काय या विवंचनेतून काही शेतकरी माल तोडत असले तरी काही शेतकऱ्यांनी मात्र माल न तोडणेच पसंत केले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील उन्हाळी टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पडलेल्या दरामुळे तोडणीलाही टोमॅटो परवडत नसल्याचे चित्र आहे. शेतात ठेऊन तरी करावं काय या विवंचनेतून काही शेतकरी माल तोडत असले तरी काही शेतकऱ्यांनी मात्र माल न तोडणेच पसंत केले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व गंगापूर तालुक्यातील कन्नड, बहिरगाव, हातनुर, टापरगाव, आलापूर, देवगाव, माळीवाडगाव, सावंगी, गवळीशिवरा, गाजगाव आदी गावांमध्ये टोमॅटोची सातत्याने उत्पादन घेतले जाते. ही गावे टोमॅटोची आगार म्हणून ओळखली जातात. खरिपात व रब्बीत त्यानंतर उन्हाळी टोमॅटो उत्पादन घेण्याचे काम या गावांमधील शेतकरी प्राधान्याने करतात. साधारणतः १५ डिसेंबर नंतर या गावांमध्ये झालेल्या टोमॅटो लागवडीचे उत्पादन जवळपास महिनाभरापासून सुरू आहे. 

सुरुवातीला २७० ते ३०० रुपये प्रति कॅरेट पर्यंत दर मिळाला. परंतु कोरोना संकटामुळे कडक लॉकडाउनचा विषय पुढ आला. त्यामुळे टोमॅटोचे प्रति कॅरेट दर जवळपास ११० ते १२० रुपये पर्यंत खाली आले. अलीकडच्या काही दिवसात तर प्रति कॅरेट ३० ते ४० रुपये दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मिळणाऱ्या दरातून ८० रुपये भाडे, १५ रुपये प्रति कॅरेट तोडणी खर्च जाता, पदरात काहीच पडत नसल्याने टोमॅटो उत्पादकांची परवड सुरू आहे. विविध ठिकाणचे बंद असलेले आठवडी बाजार याचाही टोमॅटोच्या खरेदीवर थेट परिणाम झाला असल्याचे शेतकरी सांगतात. 

कन्नड परिसरातून इतर राज्यातही टोमॅटो पाठविला जातो. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यातही अडचण येत असल्याने व विविध ठिकाणच्या बाजारपेठा कधी बंद कधी सुरू राहत असल्याने टोमॅटोची मागणी रोडावली आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोला खर्चाला परवडणारी दर मिळत नसल्याने टोमॅटो न तोडण्याचा पसंत केले आहे. 

यंदा सहा एकरांत उन्हाळ्यात टोमॅटोचे उत्पादन मिळेल, असे नियोजन केले. आतापर्यंत दीड हजार कॅरेट उत्पादन झाले. आणखी साडेतीन हजार कॅरेट उत्पादन होण्याची आशा आहे. परंतु कोरोना संकटामुळे आठवडी बाजार बंद तर अनेक बाजारपेठा कधी बंद कधी सुरू राहत असल्याने टोमॅटोचे दर कमालीचे पडले आहेत. खर्च साडेचार लाख व उत्पन्न लाखभर रुपये अशी आमची आता अवस्था आहे. 
- विलास गवळी, 
टोमॅटो उत्पादक, माळीवाडगाव, जि. औरंगाबाद. 
 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...