राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेट

अकोला ः येथील भाजी बाजारात गुरुवारी (ता.६) टोमॅटो कमीत कमी ४०० व जास्तीत जास्त ६०० रुपये क्रेट या दराने विक्री झाले. एका क्रेटमध्ये सरासरी २० किलो टोमॅटो बसतात.
 Tomatoes cost Rs 100 to Rs 600 per crate in the state
Tomatoes cost Rs 100 to Rs 600 per crate in the state

अकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट

अकोला  ः येथील भाजी बाजारात गुरुवारी (ता.६) टोमॅटो कमीत कमी ४०० व जास्तीत जास्त ६०० रुपये क्रेट या दराने विक्री झाले. एका क्रेटमध्ये सरासरी २० किलो टोमॅटो बसतात. 

सध्या टोमॅटोची नाशिक व इतर जिल्ह्यातून येथे आवक होत आहे. स्थानिक टोमॅटो अद्याप सुरु झालेला नसल्याने  बाजारात टोमॅटोचा दर वाढलेला आहे. गुरुवारी बाजारात सुमारे ३०० क्रेटपेक्षा अधिक टोमॅटोची आवक झाली होती.

सध्या पाऊस सक्रीय असून भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झालेला आहे. प्रामुख्याने टोमॅटोची लागवड स्थानिक भागात कमी झालेली असल्याने व अद्याप माल सुरु झालेला नसल्याने बाजारात तेजी दिसत आहे. गुरुवारी दुय्यम दर्जाचा टोमॅटो सरासरी २० ते २५ रुपये किलो दरम्यान, तर चांगल्या प्रतीचा २५ ते ३० रुपये किलोने विक्री झाला, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. किरकोळ बाजारात टोमॅटोची ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात होती.

परभणीत ४०० ते ६०० रूपये प्रतिक्रेट

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.६) टोमॅटोची १५०० क्रेट (३०० क्विंटल) आवक होती. टोमॅटोला प्रतिक्रेटला ४०० ते ६०० रुपये (प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये) दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, आर्वी आदी गावे, नगर जिल्हा तसेच कर्नाटकातील बेळगाव येथून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी टोमॅटोची ४०० ते १२०० क्रेट आवक झाली. त्यावेळी टोमॅटोला प्रतिक्रेट ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.६) टोमॅटोच्या १५०० क्रेटची आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्रेट ४०० ते ६०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

पुण्यात १ हजार ते  दीड हजार रूपये क्विंटल

पुणे  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.६) टोमॅटोची सुमारे दोन हजार क्रेट आवक झाली होती. यावेळी १० किलोला १०० ते १५० रुपये दर होता. कोरोना टाळेबंदीचा परिणाम अद्यापही सुरु आहे. शहरातील हॉटेल, खानावळी अद्याप सुरु न झाल्याने टोमॅटोला उठाव नाही. यामुळे दर अद्यापही सरासरी असल्याचे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले. 

दरम्यान, पुण्यानंतर फक्त टोमॅटोसाठी प्रसिद्ध असलेल्या नारायणगाव (ता.जुन्नर) येथील उपबाजारात बुधवारी (ता.५) टोमॅटोची सुमारे २२ हजार क्रेट आवक झाली होती. यावेळी २० किलोच्या क्रेटला २०० ते ४५० रुपये दर होते.

नाशिकमध्ये १०० ते ४०० रुपये प्रतिक्रेट

नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.५) टोमॅटोची आवक ७९२ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १७५० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवार (ता.४) टोमॅटोची आवक ४०० क्विंटल झाली. त्यास १००० ते २७५० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १७६० रूपये होता. सोमवार (ता.३) रोजी टोमॅटोची आवक ५९० क्विंटल झाली. त्यास ७५० ते २१२५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण सर १५०० मिळाला.

रविवारी (ता.२) टोमॅटोची आवक ५९० क्विंटल झाली. त्यास ७५० ते २१२५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० मिळाला. शनिवारी (ता.१) आवक ६९४ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १६२५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रूपये मिळाला. शुक्रवारी (ता.३१) टोमॅटोची आवक ६५० क्विंटल झाली. त्यास ७५० ते २२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० होते. गुरुवारी (ता.३०) आवक ९५० क्विंटल झाली. त्यावेळी ५०० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ११२५ रूपये होते. आवेकत सप्ताहअखेर वाढ झाली. दर स्थिर आहेत.

नगरमध्ये ५०० ते  दीड हजार रुपये क्विंटल

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.६) ३४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. प्रती क्विंटलला पाचशे ते दीड हजार रुपये व सरासरी एक हजार रुपयाचा दर मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून टोमॅटोचे दर स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर बाजार समितीत दर दिवसाला टोमॅटोची साधारण तीस ते पन्नास क्विंटलची आवक होत असते. सोमवारी (ता.३) ३५ क्विंटलची, तर रविवारी (ता.२) ४२ क्विंटलची आवक होऊन पाचशे ते एक हजार व सरासरी साडेसातशे रुपयांचा दर मिळाला. शुक्रवारी (ता. ३०) ३६ क्विंटलची आवक होऊन पाचशे ते बाराशे व सरासरी साडेआठशे, तर सोमवारी (ता. २७) ३२ क्विंटलची आवक झाली.

 एक हजार ते दिड हजार व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला आहे. नगर बाजार समितीत नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दर स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

सांगलीत २०० ते ३०० रूपये प्रतिक्रेट

सांगली  ः येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. ६) टोमॅटोची ७०० ते ८०० क्रेट आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

शिवाजी मंडईत आष्टा, विटा, दुधगाव, वाळवा, मिरज यासह कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी, कोथळी या भागातून टोमॅटोची आवक होते. बुधवारी (ता. ५) टोमॅटोची ६०० ते ७०० क्रेट आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. ४) टोमॅटोची ७०० ते ८०० क्रेटटी आवक झाली. टोमॅटोस प्रति दहा किलोस ९० ते १४० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता.३) टोमॅटोची ७०० ते ८०० क्रेटटी आवक झाली. टोमॅटोस प्रति दहा किलोस ९० ते १४० रुपये असा दर मिळाला. 

औरंगाबादमध्ये १२० ते २४० रूपये प्रतिक्रेट

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) टोमॅटोची १२३ क्विंटल आवक झाली. या टोमॅटोला ६०० ते १२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३० जुलै रोजी १६८ आवाक झालेल्या टोमॅटोला ५०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. २ ऑगस्ट रोजी टोमॅटोची आवक २११ क्विंटल, तर दर ५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३ ऑगस्टला १०९ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ५०० ते १५०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ४ ऑगस्टला टोमॅटोची आवक १४४ क्विंटल, तर दर ५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ५ ऑगस्टला १२३ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ३०० ते २००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

जळगावात ४०० ते ६०० रूपये प्रतिक्रेट

जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.६) १३ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड आदी भागातून होत आहे. दर दोन महिन्यांपासून स्थिर आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com