राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये प्रतिक्विंटल

सांगली ः येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. ४) टोमॅटोची १०० ते १२५ क्रेटची आवक झाली. टोमॅटोस प्रति वीस किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Tomatoes cost Rs 500 to Rs 2,500 per quintal in the state
Tomatoes cost Rs 500 to Rs 2,500 per quintal in the state

सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर

सांगली  ः येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. ४) टोमॅटोची १०० ते १२५ क्रेटची आवक झाली. टोमॅटोस प्रति वीस किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंडईत मिरज, वाळवा, आष्टा, दुधगाव, पलूस, कवठेपिरान या भागातून  टोमॅटोची आवक होते. गत सप्ताहापासून टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. रविवारी (ता. ३१) टोमॅटोची १५० ते २०० क्रेटची आवक झाली. त्यांना प्रति वीस किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. १) टोमॅटोची १२५ ते १५० क्रेटची आवक झाली होती. टोमॅटोस प्रति वीस किलोस ९० ते १४० रुपये असा दर होता. 

मंगळवारी (ता. २) टोमॅटोची १५० ते २०० क्रेटची आवक झाली. त्यांना प्रति वीस किलोस १०० ते  १५० असा दर मिळाला. बुधवारी (ता. ३)  टोमॅटोची १५० ते २०० क्रेटची आवक झाली. त्यावेळी प्रति वीस किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटलला ७५० ते १२५० रुपये दर

नाशिक  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता.३) टोमॅटोची १०० आवक क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान ७५० ते कमाल १२५० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये होते. पाऊस व चक्री वादळाची शक्यता असल्याने आवक कमी झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.२) टोमॅटोची आवक ६२२ क्विंटल झाली. त्यांना ३७५ ते ९०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६७५ रूपये होते. सोमवारी (ता.१) आवक ७९० क्विंटल झाली. त्यावेळी ५०० ते ११०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० होते. रविवारी (ता.३१) आवक ५२८ क्विंटल झाली. त्यावेळी ६०० ते १३०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८७५ होते. शनिवारी (ता.३०) टोमॅटोची आवक ६६७ क्विंटल झाली. त्यांना ३५० ते १००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० होते. शुक्रवारी (ता.२९) टोमॅटोची आवक २५२ क्विंटल झाली. त्यावेळी ९५० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३५० होते.

आवकेनुसार दरात चढ उतार

मंगळवार (ता.२५) ते गुरुवार (ता.२७) दरम्यान तीन दिवस बाजार समितीचे कामकाज बंद राहिले. त्यामुळे आवक झाली नाही. शुक्रवारी (ता.२९) बाजार समितीचे कामकाज सुरू झाले. मात्र, आवक कमी असल्याने या दिवशी बाजारभावात तेजी दिसून आली. मात्र, शनिवार (ता.३०) पासून आवक सुरळीत झाल्याने दरात घसरण झाल्याचे दिसून आले. मागील आठवड्यापासून बाजार समितीत टोमॅटोची आवक कमी जास्त होत आहे. आवकेप्रमाणे बाजारभाव निघत आहेत.

औरंगाबादमध्ये ५०० ते ८०० रूपये दर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ४) टोमॅटोची १४५ क्विंटल आवक झाली. त्यांना ५०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २५ मे रोजी ५१ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोंना ३०० ते ५०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. २६ मे रोजी टोमॅटोंची आवक ८९ विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २८ मे रोजी ६८ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोंना ४०० ते ६०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. ३० मे रोजी १३५ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोंना १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. 

टोमॅटोंची ३१ मे रोजी ९१ क्विंटल आवक झाली. तर दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १ मे रोजी ११२ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोंना ४०० ते १३०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. ३ मे रोजी टोमॅटोची आवक १०३ क्विंटल, तर दर ५०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

अकोल्यात क्रेटला १५० ते २०० रुपये

अकोला (प्रतिनिधी) ः येथील भाजी बाजारात गुरुवारी (ता. ४) टोमॅटो १५० ते २०० रुपये प्रतिक्रेट दराने विक्री झाले. स्थानिकसह पुणे, नाशिक भागातून टोमॅटोची आवक झाली. बाजारात सुमारे ५०० पेक्षा अधिक क्रेट टोमॅटोची आवक झाली.

लॉकडाऊनमुळे येथील भाजी बाजार प्रभावित झाला होता. मागील १५ ते २० दिवसांपासून यात बरीच सुधारणा झाली आहे. सध्या टोमॅटोची आवक कमी आहे. विक्री प्रक्रिया प्रभावित झाली असल्याने मागणीसुद्धा कमी आहे. यामुळे दर कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. एका क्रेटमध्ये १८ ते २० किलो टोमॅटो असतात. क्रेटला १५० ते २०० दरम्यान गुरुवारी दर मिळाला. उत्कृष्ट दर्जाचा टोमॅटो सरासरी २०० रुपये क्रेटने विक्री झाला. तर, दुय्यम दर्जाचा टोमॅटो १५० ते २०० रूपये दरम्यान विक्री झाला.

परभणीत ७५० ते १००० रुपये दर 

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.४) टोमॅटोंची १६० क्विंटल (८०० क्रेट) आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७५० ते १००० रुपये (प्रतिक्रेट १५० ते २०० रुपये) दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून टोमॅटोची आवक होत आहे. संचारबंदीमुळे गेल्या महिनाभरात टोमॅटोची मागणी, तसेच आवकेवर परिणाम झाला. दरांत चढ- उतार सुरु आहेत. महिनाभरात सरासरी १०० ते २५० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटलला ३०० ते १५०० रुपयेपर्यंत दर मिळाले. 

गुरुवारी (ता.४) टोमॅटोंची १६० क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर ७५० ते १००० रुपये प्रतिक्विंटल होते. तर, किरकोळ विक्री १५ ते २० रुपये किलो दराने सुरु होती, असे व्यापारी सय्यद मुसा यांनी सांगितले.

कोल्हापुरात दहा किलोस ८० ते १२० रुपये दर

कोल्हापूर : येथील बाजार समितीत टोमॅटोची दररोज ८०० ते ९०० कॅरेट इतकी आवक होत आहे. दहा किलोस ८० ते १२० रुपये इतका दर मिळत आहे, अशी माहिती मिळाली.

बाजार समितीत उन्हाळी हंगामात बहुतांशी करून बेळगाव सांगली जिल्ह्यातून टोमॅटोची आवक होते. पण, लॉकडाऊनमुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याने या भागातून होणारी टोमॅटोची होणारी आवक मंदावली आहे. सध्या जिल्ह्याच्या पूर्व भागातून काही प्रमाणात टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोलापुरात टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी सर्वाधिक २५० रुपये

सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या भाजीपाल्याचे लिलाव बंदच आहेत. पण, शेतकरी आणि ग्राहक अशी थेट विक्री आहे. यामध्ये गतसप्ताहात टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी २०० ते २५० रुपये इतका दर मिळत असल्याची माहिती देण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या आवारात फळे आणि भाजीपाल्याचे लिलाव गेल्या दोन महिन्यापासून बंद आहेत. अद्यापही ते सुरु नाहीत. पण शेतकऱ्यांसाठी शहरात सहा ठिकाणी थेट शेतकरी आणि ग्राहक अशी विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. एरव्ही बाजार समितीत टोमॅटोची प्रतिदिन ५०० क्विंटल ते एक टनापर्यंत आवक होते. गेल्या आठवड्यात त्यात काहीशी घट झाली. अंदाजे ३०० ते ५०० क्विंटलपर्यंत आवक झाली. त्या आधीच्या आठवड्यातही १०० ते २०० क्विंटलपर्यंत आवक असल्याचे सांगण्यात आले. टोमॅटोचे दर मात्र मागणी आणि आवकेच्या प्रमाणात काहीसे स्थिर राहिले. टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी किमान १५० रुपये, सरासरी २०० रुपये आणि सर्वाधिक २५० रुपये असा दर मिळाला.

पुण्यात १ हजार ते १२५० रूपये प्रतिक्विंटल

पुणे  ः निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्याने गुरुवारी (ता.४) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची अवघी २०० क्रेट आवक झाली होती. तर, २० किलोच्या क्रेटला २०० ते २५० रुपये दर होता, अशी माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली. 

कोरोना टाळेबंदीनंतरी बाजार आवार अद्याप सुरळीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे आवक अजुनही अत्यल्पच आहे. दरम्यान, नारायणगाव येथील टोमॅटोच्या खुल्या बाजारात बुधवारी (ता.३) ११ हजार क्रेट टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी क्रेटला ८० ते १४० रुपये दर असल्याची माहिती जुन्नर बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com