Agriculture news in marathi, Tomatoes cost Rs 500 to Rs 5,000 per quintal in the state | Agrowon

राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021

नांदेड : नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडा नाका ठोक बाजारात सध्या टोमॅटोला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे आवक कमी झाली. परिणामी, दर वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

नांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये

नांदेड : नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडा नाका ठोक बाजारात सध्या टोमॅटोला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे आवक कमी झाली. परिणामी, दर वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

सध्या टोमॅटोची तीन ते पाच टन आवक बाजारात होत आहे. नांदेड शहरात इतवारा तसेच पूर्णा रोडवरील तरोडा नाका भागात भाजीपाल्याचे बीट होते. या भागात सध्या स्थानिक शेतकऱ्यांचा टोमॅटो येत आहे. मागील सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे आवकेवर परिणाम होऊन आवक घटली आहे. यामुळे सध्या बाजारात टोमॅटोचे भाव वधारले आहेत. प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपये दर टोमॅटोला मिळत आहे, अशी माहिती ठोक व्यापारी महंमद जावेद यांनी सांगितली. आगामी काही दिवस टोमॅटोचे दर चढे राहतील, असे त्यांनी सांगितले.

परभणीत क्विंटलला २००० ते ४००० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे- भाजीपाला मार्केट मध्ये गुरुवारी (ता.१४) टोमॅटोची १२०० क्रेट (२४० क्विंटल) आवक होती. टोमॅटोला प्रतिक्रेट किमान ४०० ते कमाल ८०० रुपये, तर सरासरी ६०० रुपये (प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल ४००० रुपये, तर सरासरी ३००० रुपये) दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील मार्केटमधील टोमॅटोची आवक कमी झाली आहे. दरात सुधारणा झाली आहे. सध्या औरंगाबाद जिल्हा तसेच स्थानिक परिसरातील गावातून दररोज सरासरी १००० ते १५०० क्रेट टोमॅटोची आवक होत आहे. 

गेल्या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी ८०० ते ३५०० क्रेटची (१६० ते ७०० क्विंटल) आवक झाली. त्यावेळी प्रतिक्रेट १२० ते ८०० रुपये (प्रतिक्विंटल ६०० ते ४००० रुपये) दर मिळाले. गुरुवारी (ता. १४) घाऊक विक्रीचे दर २००० ते ४००० रुपये क्विंटल होते. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

नगरमध्ये क्विंटलला १००० ते २००० रुपये 

नगर ः अनेक दिवसानंतर टोमॅटोच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.१४) टोमॅटोची १९३ कोटीची आवक झाली. प्रतिक्विंटल एक ते २ हजार रुपये व सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक अधिक होत असते. नगरला ११ सप्टेंबर रोजी ८८ क्विंटलची आवक झाली. १ हजार ते ३ हजार ५०० व सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला. ८ सप्टेंबर रोजी १८० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार व सरासरी २ हजार रुपयांचा दर मिळाला. ७ आक्टोबर रोजी २२० क्विंटलची आवक झाली. त्यामुळे १ हजार ते ३ हजार व सरासरी २ हजार रुपयांचा दर मिळाला. गेल्या अनेक दिवसानंतर जिल्ह्यात टोमॅटोच्या दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांत उत्साह आहे.

कोल्हापुरात क्विंटलला ५०० ते ३५०० रुपये

कोल्हापूर: येथील बाजार समितीत टोमॅटोच्या दरात सुधारणा झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून टोमॅटोच्या दरात वाढ काम आहे. बाजार समितीत दररोज दोन ते अडीच हजार कॅरेट टोमॅटोची आवक सुरू आहे. टोमॅटोस दहा किलोस ५० ते ३५० रुपये इतका दर मिळत आहे.

गणेशोत्सवाच्या दरम्यान टोमॅटोच्या दरात सातत्य नव्हते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. गेल्या सप्ताहापासून मात्र टोमॅटोच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिल्याने टोमॅटोच्या आवकेत मोठी घट झाली. 

नवीन लागवड केलेल्या टोमॅटोला बाजारात येण्यास वेळ आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत टोमॅटोची चणचण भासत आहे. याचाच परिणाम दरवाढ होण्यावर झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

जळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१४) टोमॅटोची १८ क्विंटल आवक झाली. दर १८०० ते २८०० व सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल, असा होता. आवक गेल्या १८-२० दिवसांत कमी झाली आहे. दर स्थिरावले आहेत. मध्यंतरी दर कमी होते. पण गेल्या काही दिवसांत दरात सुधारणा झाली आहे. आवक जामनेर, जळगाव, चोपडा, यावल आदी भागातून होत आहे. 

अकोल्यात प्रतिक्विंटलला ३५०० ते ५००० रुपये 

अकोला ः येथील बाजारपेठेत टोमॅटोला प्रतिक्रेट कमीत कमी ७०० ते कमाल १००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गुरुवारी (ता.१४) अकोला बाजारपेठेत हा दर मिळाला. टोमॅटोची तिनशे ते चारशे क्रेट आवक झाली होती.

यंदा सततच्या पावसाचा जोरदार तडाखा टोमॅटो उत्पादकांना बसला आहे. त्यामुळे सध्या चांगल्या दर्जाच्या मालाची आवक अत्यंत कमी होत आहे. प्रामुख्याने नगर, नाशिकसह मराठवाड्यातील टोमॅटोची अकोला बाजारात अधिक आवक होत असते. मात्र, गेल्या काळातील पावसाने टोमॅटोच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. याचा फटका उत्पादनावर झाला आहे. येथील बाजारात सध्या आवक कमी होत आहे.

सध्या हॉटेल्स सुरु झाले. बाजार पूर्ण क्षमतेने भरत आहेत. मागणी वाढल्याने व तुलनेने आवक कमी असल्याने टोमॅटोचा दर वधारत असल्याचे व्यापारी सूत्राने म्हणणे होते. येथील बाजारात स्थानिक भागातीलच टोमॅटोची सध्या आवक सुरु आहे. टोमॅटोची किरकोळ विक्री प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांदरम्यान प्रतिकिलोने केली जात आहे.

पिंपळगाव बसवंतमध्ये क्विंटलला २४५५ रुपये 

नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१३) टोमॅटोची आवक ३३,४३४क्विंटल झाली. त्यामध्ये १,६७,१७० क्रेटचा लिलाव झाला. २० किलोच्या प्रतिक्रेटला किमान७१ ते कमाल ८३१ रुपये दर मिळाला. ५,४६५ शेतकरी या दिवशी माल घेऊन विक्रीसाठी आल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.१२) आवक १,८८,७७५ क्रेट झाली. त्यास ६१ ते ७९१ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३१ रुपये होता. सोमवारी (ता.११) आवक १,९४,६१० क्रेटची झाली. त्यास ६१ ते ७३१ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३९१ रुपये राहिला. रविवारी (ता.१०) आवक ५७,८२५ क्रेट झाली. त्यास ५१  ते ६५१ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३६१ रुपये राहिला.

शनिवारी (ता.९) आवक२,३०,४१५ क्रेट झाली. त्यास २१ ते १४१ रुपये दर मिळाला. शुक्रवारी (ता.८) आवक १,२६,२८५ क्रेट झाली. त्यास ५१ ते ६११ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७१ रुपये राहिला. गुरुवारी (ता.७) आवक १,५८,३२५ क्रेट झाली. त्यास प्रतिक्रेट १०१ ते १०७५ असा दर मिळाला.       आवक मागील महिन्याच्या तुलनेत कमी होत आहे. पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. तर मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे.

औरंगाबादमध्ये क्विंटलला २००० ते ४८०० रुपये 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१४) टोमॅटोची ४२ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला २००० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी ३४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १३ ऑक्‍टोबरला ४९ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २ हजार ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. १२ ऑक्टोबरला ६४ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १२०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ११ ऑक्टोबरला ८४ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

१० ऑक्टोबर ८१ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  ९ ऑक्टोबरला ७८ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी १६०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ७ ऑक्टोबरला ११४ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे सरासरी दर ४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.


इतर बाजारभाव बातम्या
नगरला शेवगा, सिमला मिरचीच्या दरात तेजी नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
 आवक सुरळीत; पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
मराठवाड्यात वीस टक्‍केच पीककर्ज पुरवठाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७५० रुपये...लातूरमध्ये क्विंटलला ६२०५ ते ६७५० रुपये लातूर...
सोलापुरात सिमला मिरची, वांगी, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये डाळिंब दरात सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...